Homeताज्या बातम्यादेश

सुखविंदर सिंह सक्खू यांनी घेतली हिमाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

सिमला : हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आणि मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सिमला ये

अमृता फडणवीसांचा सापासोबत फोटो
पावसाअभावी पिके कोमेजल्याने शेतकरी चिंतेत
दिलीप धारूरकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

सिमला : हिमाचल प्रदेशचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आणि मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सिमला येथील रिज मैदानावर हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सुक्खू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.


 नूतन उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पहिल्या कॅबिनेट बैठकीत जनतेला दिलेली आश्‍वासने आम्ही पूर्ण करू. जुनी पेन्शन योजना पूर्ववत केली जाईल. काँग्रेस कोणत्याही राज्यात सत्तेवर येणार नाही, असे पूर्वी लोक म्हणायचे, पण आज आम्ही भाजपचा रथ रोखला आहे. शपथ घेण्यापूर्वी मुख्यमंत्री सुक्खू प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आता राजकारण बदलत आहे आणि काँग्रेसमध्ये सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या जबाबदार्‍या मिळत आहेत. हिमाचलच्या निकालामुळे देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. सुखविंदर सिंग सुक्खूंची आई संसार देवी शपथविधी सोहळ्यापूर्वी सिमल्याच्या संजोली हेलिपॅडवर पोहोचल्या. येथे सुक्खूंनी त्यांचे स्वागत केले. मुलगा यापुढेही जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली. शिमला ग्रामीण मतदारसंघातून दुसर्‍यांदा आमदार झालेले आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य म्हणाले की, काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. पक्षाने कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिल्यास खरा सैनिक म्हणून जबाबदारी पार पाडली जाईल.

COMMENTS