Homeताज्या बातम्यादेश

एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

बंगळुरू: कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थ

पोलिसांच्या गाडीने चौघांना चिरडले; एकाचा मृत्यू
दहशतादी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
आमदार खासदार यांनी अंतरवलीत जाऊन जरांगेच्या मागण्या पूर्ण कराव्यात – सकळ मराठा समाज नाशिक  

बंगळुरू: कर्नाटकच्या तुमकुरुमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत सापडले. आर्थिक कारणांमुळे कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. ३३ वर्षांच्या गरनेब यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला. त्यात त्यांनी आर्थिक अडचणींचा उल्लेख केला होता. यासोबतच काही जणांची नावं घेतली होती. या व्यक्ती आपल्या कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप त्यानं केला होता. या व्हिडीओत गरनेबनं आत्महत्येचा उल्लेखही केला होता. तुमकुरुचे पोलीस अधीक्षक अशोक के. व्ही. यांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आम्हाला एकाच घरात पाच मृतदेह आढळल्याचं समजलं. त्यात एका महिलेचा, एका पुरुषाचा आणि तीन मुलांचा समावेश होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

COMMENTS