Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिसाची आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस अंमलदार अर्चना रोहिदास कासार (रा. नवना

हॉटेल एक्सप्रेस इन इथल्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
महिलेची तीन लहान मुलासह आत्महत्या
महिलेची सोसायटीच्या जिन्यात आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी ः येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस अंमलदार अर्चना रोहिदास कासार (रा. नवनाथनगर, बोल्हेगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (8 जानेवारी) सकाळी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अर्चना कासार या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. त्यांना शनिवारी रात्री ड्युटी होती. त्यांनी रात्रभर ड्यूटी केल्यावर त्या रविवारी सकाळी घरी गेल्या. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. त्यांना त्यांचे नातेवाईक सागर शिवाजी सुद्रिक (रा. भूतकरवाडी, सावेडी) यांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अर्चना कासार यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांसह त्यांच्या मैत्रिणींनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. पोलिसात असलेल्या पतीचे निधन झाल्यानंतर अनुकंपा तत्वावर त्या पोलिस सेवेत काही वर्षांपूर्वी भरती झाल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी पोलिस दलात चर्चा आहे.

COMMENTS