सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावकाराच्या जाचास कंटाळून केली आत्महत्या

।संगमनेर/प्रतिनिधी : सावकाराच्या जाचास कंटाळून राजापुरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी दि.१७ रोजी सकाळी समोर आली. वीस हजार रुपया

कष्टप्रद जीवन हा रयतच्या शिक्षकांचा स्थायीभाव : नवनाथ बोडखे        
राहुरीमध्ये तुतारी विरूद्ध घडयाळीचा सामना
ना.विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

।संगमनेर/प्रतिनिधी : सावकाराच्या जाचास कंटाळून राजापुरमधील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी दि.१७ रोजी सकाळी समोर आली. वीस हजार रुपयांपोटी तब्बल दीड लाख रुपये देऊनही आणखी पैशाची मागणी हा सावकार करत होता. सावकारीच्या जाचाला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी मयतेच्या पत्नीने केला आहे. यासंदर्भात मृताच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकारणी संताप व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी दोघा सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सावकारांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळाली.
अण्णासाहेब निवृत्ती नवले (वय ४३ वर्षे) रा. राजापुर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नांव असून मृत नवले यांच्या पत्नीने दिलेल्या फियार्दीवरुन संगमनेरमधील सुदाम दुधे (रा. नेहरु चौक) व बालकिसन (पुर्ण नांव माहिती नाही रा. देवाचा मळा, संगमनेर) या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिस्थितीने अतिशय गरीब असलेल्या अण्णासाहेब नवले यांनी आपल्या आर्थिक अडचणी दुर करण्याकरीता दुधे व बालकिसन यांच्याकडून २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. दरवेळी या पैशाची परतफेड करत त्यांनी तब्बल दीड लाख रुपये या सावकारांना दिले. मात्र तरीदेखील त्यांच्याकडून आणखी व्याजाची अवास्तव मागणी सुरुच होती. सावकारांच्या सातत्याने होणाऱ्या आर्थिक मागणीला कंटाळून नवले यांनी सोमवारी सकाळी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात येत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नवले यांच्या पत्नी आशा नवले यांनी दिलेल्या फियार्दीवरुन शहर पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडे सावकारकीचा परवाना आहे किंवा नाही याची माहिती समजु शकली नाही. पोलीस तपासात ही बाब पुढे येणार असुन पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख पुढील तपास करत आहे.

COMMENTS