Homeताज्या बातम्यामनोरंजन

कपिल शर्मा’ फेम सुगंधा लवकरच होणार आई

मुंबई प्रतिनिधी - स्टँडअप-कॉमेडियन  संकेत भोसले आणि अभिनेत्री  सुगंधा मिश्रा हे कपल सध्या चर्चेत आहे. या जोडप्याच्या घरी लवकरच एका चिमुकल्या

मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला एवढं मारलं की विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झाला.
मुंबईत राष्ट्रवादीचा ईडी कार्यालयासमोर निषेध मोर्चा
आमदार लहामटेच्या पुढाकाराने सुसज्ज ॲक्सिजन प्लॅन्ट व कोविड सेंटर -जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील

मुंबई प्रतिनिधी – स्टँडअप-कॉमेडियन  संकेत भोसले आणि अभिनेत्री  सुगंधा मिश्रा हे कपल सध्या चर्चेत आहे. या जोडप्याच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुणाचे आगमन होणार आहे.नुकताच सुगंधाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला सुगंधा आणि संकेत यांच्या  कुटुंबाने तसेच त्यांच्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. सुगंधाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा यांनी सोशल मीडियावर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, “आमचा बेबी शॉवर कार्यक्रम हा महाराष्ट्रीयन पारंपारिक पद्धतीने (डोहाळे जेवण) पार पडला. ओटी भरण, पूजा आणि बर्फी पेडा  कार्यक्रम इत्यादी गोष्टी पार पडल्या. तसेच केक कटिंग देखील करण्यात आलं, डायपर चेंजिंग सारखे मजेशीर खेळ देखील आम्ही खेळलो.” पुढे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “आम्ही एका स्पेशल गाण्यावर परफॉर्म देखील केलं.आम्ही हे गाणं आमच्या बाळासाठी लिहिलं आहे. हे गाणं सुगंधाने लिहिलेले आणि संगीतबद्ध केले आहे. तसेच हे गाणं आम्ही दोघांनी गायलं आहे. ते लवकरच आम्ही तुमच्यासोबत शेअर करू”

COMMENTS