Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुधा मुर्ती गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी लिन

कोपरगाव शहर ः ज्येष्ठ लेखिका तसेच इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या सासूबाई सुधा नारायण मूर्ती यांनी रविवारी 2 जून रोजी कोपरगाव शहरात बेट भाग

Sangamner : बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्याला भोवणार?
करंजीचा वेदांत सोनवणे एम.बी.बी.एस परीक्षेत उत्तीर्ण
बेशुद्धावस्थेत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

कोपरगाव शहर ः ज्येष्ठ लेखिका तसेच इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या सासूबाई सुधा नारायण मूर्ती यांनी रविवारी 2 जून रोजी कोपरगाव शहरात बेट भागात वसलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदीरात भेट देत महाराजाचे मनोभावे दर्शन घेतले.
या प्रसंगी सुधा मूर्ती यांनी आपली मुलगी व जावई ऋषी सुनक व कुटुंबीय साठी गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या कडे संकल्प करून साकडे घातले. तसेच त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करत मंदिराचा इतिहास जाणून घेतला. या प्रसंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, दत्तात्रय सावंत, भगचंद रुईकर, बाळासाहेब लकारे, सुशांत घोडके, डॉ. संतोष आव्हाड, प्रमोद कोर्‍हाळकर, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा, पुजारी जोशी गुरू व भणगे गुरू उपस्थीत होते. या प्रसंगी मंदीर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी सुधा नारायण मुर्ती यांच्याकडे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना सह कुटुंब मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले.

COMMENTS