Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावमध्ये हमालाचा असाही प्रामाणिकपणा

शेवगाव तालुका ः शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत दुकानदार राम सारडा यांच्या दुकानात वरूर गावातील हमाल  कामगार जालिंदर रेवडकर, नवनाथ लव्हाट

तुकाराम भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
कोंढवड येथील महिला बचतगटांना कर्जाचे वितरण
कोरोनाचे नवे 15 रुग्ण आढळल्याने अकोले हादरले

शेवगाव तालुका ः शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत दुकानदार राम सारडा यांच्या दुकानात वरूर गावातील हमाल  कामगार जालिंदर रेवडकर, नवनाथ लव्हाट, सचिन म्हस्के, गणेश म्हस्के, गणेश इथापे यांना हसनापूर येथील शेतकरी गोरक्षनाथ बाजीराव ढाकणे यांनी विक्रिसाठी आणलेल्या धान्याच्या गोणीत मार्केटमध्ये साडेतीन तोळे सोने मालाची सफाई करताना मिळवून आले. त्यानंतर त्यांनी मार्केट कमिटीचे सचिव अविनाश मस्के यांच्याकडे दुकानदार राम सारडा यांच्या मार्फत जमा केले. हसनापूर येथील शेतकर्‍यांच्या वतीने मार्केट कमिटी कार्यालयात पुरुषोत्तम बिहानी, राम सारडा व व्यापार्‍यांच्या उपस्थिती त्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वीही मार्केटमध्ये असे इमानदारीचे दर्शन घडले असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले. हमालानी दाखवलेल्या इमानदारीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

COMMENTS