Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळनेर येथे संत निळोबाराय यात्रेची जय्यत तयारी

निघोज प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील सद्गुरू निष्ठ संत निळोबाराय महाराज 271व्या संजीव

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 50 दिवसानंतर आंदोलन मागे
गोकुळचंदजी विद्यालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती उत्साहात
श्री क्षेत्र निंबे येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ

निघोज प्रतिनिधी ः पारनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील सद्गुरू निष्ठ संत निळोबाराय महाराज 271व्या संजीवनी समाधी सोहळ्या निमित्ताने सजली पिंपळनेर नगरी6मार्च 2024ते13मार्च2024 या काळात महाराष्ट्रातील कीर्तनकारळची  कीर्तने होणार असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे या काळात आयोजन करण्यात आले आहे .
       संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त पहिला टाळ 11 मार्च 2024 रोजी सकाळी सहा ते सात संजीवनी समाधीची महापूजा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या वतीने होणार आहे तसेच सकाळी आठ ते दहा कीर्तन दुसरा टाळ 12 मार्च 2024रोजी असून हैबत बाबा फडकरी श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संस्थान आळंदी यांच्या वतीनेसकाळी सहा ते सात संजीवनी समाधी महापूजा व किर्तन13 मार्च 2024 शासकीय महापूजा सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी सिध्दीराम सालिमठ यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहेसकाळी आठ ते दहा हभप ज्ञानेश्‍वर माऊली कदम यांचे किर्तनकाल्याचे किर्तन दुपारी बारा ते दोन हभप पांडुरंग महाराज घुले यांचे होणार आहे . तीन दिवस होणार्‍या संजीवनी समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त येणार्‍या वारकरी भाविकांसाठी निळोबाराय देवस्थान ट्रस्ट व पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जेणेकरून भाविकांना कोणतीही अडचण येणार नाहीतसेच सात दिवस होणार्‍या सप्ताह मध्ये रात्री सात ते नऊ कीर्तन संपल्यानंतर येणार्‍या भाविकांना वारकर्‍यांना भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे .

COMMENTS