Homeताज्या बातम्यादेश

ईओएस-08 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शुक्रवारी सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी ईओएस-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे (एसएसएलव्ही)

गल्लीतला दादा अन् दिल्लीतला दादा सारखाच : अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर
राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांची रावळगाव येथील पवार बंधुंच्या प्रक्षेत्रास भेट
कोपरगाव तालुक्यात मान्सूनपूर्व कामाला वेग

नवी दिल्ली ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शुक्रवारी सकाळी 9 वाजून 17 मिनिटांनी ईओएस-08 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे (एसएसएलव्ही) डी-3 या लघु उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने प्रक्षेपण केले. मायक्रोसॅटेलाईट बसला अनुरुप असलेली पेलोड सामग्री तयार करून आणि भावी परिचालनात्मक उपग्रहांना लागणार्‍या नव्या तंत्रज्ञानाचा समावेश करून मायक्रोसॅटेलाईटची (सूक्ष्मउपग्रह) रचना आणि विकास करणे ही ईओएस-08 मोहिमेची प्राथमिक उद्दिष्टे आहेत.
या उपग्रहाद्वारे होणारी टेहळणी, आपत्ती देखरेख, पर्यावरण देखरेख, अग्निशोध, ज्वालामुखीय हालचालींचे निरीक्षण आणि औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्पांमधील आपत्ती देखरेख यांसारख्या कामांसाठी उपयोग होणार आहे. याशिवाय सागरी पृष्ठभागावरील वार्‍यांचे विश्‍लेषण, मृदा आर्द्रता मूल्यांकन, हिमालय प्रदेशावरील  क्रायोस्फिअर अभ्यास, पूर शोध आणि अंतर्गत जलाशय शोध यांसारख्या उपयोजनांसाठी जीएनएसएस-आर आधारित रिमोट सेन्सिंगचा वापर करण्याची क्षमता जीएनएसएस-आर या उपकरणात आहे. दरम्यान, एसआयसी यूव्ही डोसिमीटर गगनयान मोहिमेतील क्रू मॉड्यूलच्या व्ह्यूपोर्टवर अतिनील विकीरणावर देखरेख ठेवते  आणि गॅमा रेडिएशनसाठी हाय डोस अलार्म सेन्सर म्हणून काम करते. हा उपग्रह पृथ्वीपासून 475 किमी उंचीवर पृथ्वीजवळच्या खालच्या वर्तुळाकार कक्षेत 37.4ओ कोनात कार्यरत राहील आणि त्याचे मोहीम आयुर्मान एक वर्षाचे आहे. त्याचे वजन सुमारे 175.5 किलो आहे आणि तो सुमारे 420 वॉट ऊर्जानिर्मिती करू शकतो. एसएसएलव्ही डी-3 प्रक्षेपकाला तो जोडलेला आहे.

COMMENTS