पालघर : सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या श्रृंखलेमध्ये महार
पालघर : सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहे. सदर प्रयोग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लू इन्फिनिटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत आहे.
या उपक्रमामध्ये ड्रोनद्वारे लसवाहतुकीमुळे अतिदुर्गम भागात जलद गतीने लस पोहोचवता येईल ज्यामुळे शीतसाखळी अबाधित राहील आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळेची व मनुष्यबळाची बचत होईल.
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील काळात ड्रोनद्वारे अत्यावश्यक औषधे पाठविणे, रक्त पाठविणे, प्रत्यारोपणाकरिता अवयव एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पाठविणे विना अडथळा व अत्यंत कमी वेळामध्ये सहज शक्य होईल. सदर उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास व सार्वजनिक आरोग्य आयुक्त तथा अभियान संचालक एन.एच.एम डॉ. रामास्वामी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हयाच्या आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांचा सहकार्याने राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राबविताना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संचालक सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उपसंचालक मुंबई मंडळ ठाणे यांचे मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरले आहे.
COMMENTS