Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिल्लीयाची शेख अस्मत जहांँ हिचे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील गणित परिसंवाद स्पर्धेत यश

बीड प्रतिनिधी - यशवंत महाविद्यालय नांदेड आणि मराठवाडा मँथेमँटिकल सोसायटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मार्च 2023 रोजी आयोजित

राज्यभर कांदा लिलाव ठप्प
रामनवमी निमित्त वर्ध्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन 
वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही स्वराने गाठली गुणांची शंभरी; दहिवडी कन्या शाळेतील कु. स्वरा टकले हिने दहावी परिक्षेत मिळवले 100 टक्के गुण

बीड प्रतिनिधी – यशवंत महाविद्यालय नांदेड आणि मराठवाडा मँथेमँटिकल सोसायटी, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 मार्च 2023 रोजी आयोजित केलेल्या  19 व्या अंतिम गणित परिसंवाद स्पर्धेत मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, बीडची बी.एस्सी. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.शेख असमत जहाँ अब्दुल रौफ हीस पाचवे पारितोषिक मिळाले.पहिल्या विभागीय फेरीत, कु.शेख असमत जहाँ हिला द्वितीय पारितोषिक मिळाले होते.अंतिम फेरीत विविध जिल्ह्यातील एकूण वीस विद्यार्थींची निवड करण्यात आली होती. अंतिम स्पर्धा ही यशवंत महाविद्यालय  नांदेड येथे घेण्यात आली. या स्पर्धेत मिल्लिया महाविद्यालयाची कु.शेख असमत जहाँ अब्दुल रौफ हिला पाचवे पारितोषिक मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सलीम बीन अहमद बीन महफुज, सचिव श्रीमती खान सबिहा बेगम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील, उपप्राचार्य डॉ.सय्यद हनीफ, उपप्राचार्य डॉ.हुसैनी एस.एस. गणित विभाग प्रमुख प्रा.मोमीन फसीयोद्दीन, प्राध्यापिका फर्रा फातेमा नहरी, नॅक समन्वयक डॉ. अब्दुल अनिस,पदव्युत्तर विभागाचे संचालक प्रा.फरीद अहमद नहरी, सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले.

COMMENTS