Homeमहाराष्ट्रअहमदनगर

हॉकी स्पर्धेत ‘गौतम’च्या विद्यार्थ्यांचे यश 

कोपरगाव : गौतम नगर येथील गौतम पब्लिक स्कूलमध्ये ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड झाल्याने शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात भर पडली आहे.  मध्यप्रदेशातील टिकमगड येथे २२ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली. या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचे कर्णधारपद भूषविले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने उल्लेखनीय कामगिरी केली, अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.  महाराष्ट्र संघात कुमार कृष्णा सातपुते याच्यासह श्रेयश गाडेकर, प्रणव लोंढे, रणवीर नागलोट आणि लोकेश पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. उपांत्यपूर्व सामन्यात ओडिसा संघाशी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र संघाला २–१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. या पाचही खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली  काळे, संस्था सदस्य व विश्वस्त, निरीक्षक नारायण बारे तसेच प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, राजेंद्र आढाव आणि इसाक सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना
गौतम पब्लिक स्कूल क्रिकेटमध्ये अजिंक्य
गौतम पब्लिक स्कूलमध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचा समारोप

कोपरगाव : गौतम नगर येथील गौतम पब्लिक स्कूलमध्ये ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ जाहीर करण्यात आला. या संघात गौतम पब्लिक स्कूलच्या पाच खेळाडूंची निवड झाल्याने शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात भर पडली आहे.

 मध्यप्रदेशातील टिकमगड येथे २२ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठली. या स्पर्धेतील विशेष बाब म्हणजे गौतम पब्लिक स्कूलचा खेळाडू कुमार कृष्णा सातपुते याने महाराष्ट्र हॉकी संघाचे कर्णधारपद भूषविले. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने उल्लेखनीय कामगिरी केली, अशी माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली.

 महाराष्ट्र संघात कुमार कृष्णा सातपुते याच्यासह श्रेयश गाडेकर, प्रणव लोंढे, रणवीर नागलोट आणि लोकेश पाटील या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. उपांत्यपूर्व सामन्यात ओडिसा संघाशी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्र संघाला २–१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला.

या पाचही खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव चैताली  काळे, संस्था सदस्य व विश्वस्त, निरीक्षक नारायण बारे तसेच प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख सुधाकर निलख, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, राजेंद्र आढाव आणि इसाक सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS