शेवगाव प्रतिनिधी ः माजी आमदार राजीव राजळे हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते, जागतिक दर्जाच्या पुस्तकाचे ते वाचक होते, वाचनामुळे कुठल्याही विषयावर बोलण्
शेवगाव प्रतिनिधी ः माजी आमदार राजीव राजळे हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते, जागतिक दर्जाच्या पुस्तकाचे ते वाचक होते, वाचनामुळे कुठल्याही विषयावर बोलण्याची त्याची क्षमता होती. मित्र म्हणून बर्याच गोष्टी त्याच्याकडून आम्ही शिकलो. मनुष्याने कोणताही निर्णय घेतला तर यश अपयशाची चिंता बाळगू नये. निडर व निर्भीडपणे आपल्या निर्णयाचा पाठपुरावा केल्यास जीवनात निश्चित यशोशिखर गाठता येते याचे उदाहरण राजीवभाऊ होते, ते आपल्या जीवनात विविध क्षेत्राचा व्यापक अभ्यास करून प्राप्त केलेल्या लौकिकामुळे ते आजही लोकांच्या मनोशीखरावर विराजमान आहेत. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मित्रपरिवाराने आपल्या अश्रूंना ताकद बनवून त्यांचे विचार लोकांना चिरकाल प्रेरणा व स्फूर्ती देत राहतील या दृष्टीने प्रयत्नपूर्वक काम करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले.
माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शेवगाव येथील राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव बुक फेस्ट 2022 उपक्रमाचा शुभारंभ चिवटे यांचे हस्ते ज्येष्ठ साहित्यिक शरद तांदळे यांच्या प्रमख उपस्थितीत सोमवारी करण्यात आला . शेवगावचे भूमिपूत्र ज्येष्ठ उद्योजक मंदार भारदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंगेश चिवटे म्हणाले कि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या शासनाने मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्ष नव्याने विकसित केला असून आतापर्यंत पार पडलेल्या राज्यातीत 2 हजार 500 शिबीरातून 6 लाख लोकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना 10 कोटी रुपयावर किंमतीच्या औषधांचे वाटप करण्यात आले. 20 हजार रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात साडेतीन हजार बालकांचाही समावेश आहे .गरजूंसाठी वैद्यकीय अर्थसाह्याची मदत तीन लाखापर्यंत वाढविण्यात आली असून आपण ही माहिती परिसरातील गरजू पर्यंत पोहोचून आमदार मोनिकाताई राजळे यांचे संपर्क कार्यालयात संपर्क साधून आमच्यापर्यंत पोहोचू शकता शकता. ज्येष्ठ साहित्यिक तांदळे म्हणाले की वाचनामुळे जीवन समृद्ध होते. व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर आजच्या युवा पिढीने वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे. शेवगाव येथील माजी नगरसेवक महेश फलके यांच्या मित्र मंडळांनी ग्रामीण परिसरात वाचन संस्कृती अधिक समृद्ध व्हावी यासाठी स्व.राजीव राजळे यांच्या जयंती दिनानिमित्त प्रत्येक वर्षी पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून या परिसरातील विविध क्षेत्रातील त्यांच्या या प्रयत्नास भरभरून साथ देण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारदे यांनी पुस्तकापुढे आपली नजर जो झुकवतो तो जगापुढे माणूस म्हणून मान उंचावून चालतो. पुस्तकाशिवाय मोठेपणा सहज शक्य नसल्याने व जीवनातील सर्व प्रकारच्या आवाहनाचा मुकाबलामोनिकाताईला करण्याची ताकद वाचनातून प्राप्त होत असल्याने वाचन संस्कृती वाढवणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले. उपक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक फलके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, सुनील रासने, गणेश रांधवने, अशोक अहुजा, सागर फडके, संदीप जावळे संभाजीराव काटे, अमित तिवारी, विनोद शिंदे, हरीश भारदे, अमोल घोलप, वाय डी कोल्हे, महेश शेटे, अशुतोष डहाळे, संदीप वाणी, राम केसभट, किरण पवार, दिगंबर काथवटे, गणेश कोरडे, रवींद्र सुरवसे, आशाताई गरड, दिनेश लाव्हाट, अमित पालवे, भाऊसाहेब मुरकुटे, विजय नजन, आदि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. निलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर संदीप खरड यांनी आभार मानले.
COMMENTS