Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यश आणि अपयश.. 

जर आपल्या जीवनात थोडे सावकाशपणे जाणून घेतले तर आपण या दोनच गोष्टीत जगत असतो. म्हणजे एखाद्या कार्यात यश मिळाले तर आपण खूश होतो, आनंदित होतो, गगनाल

मखमलाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लालबागच्या राजाच्या दर्शनाची गर्दी पाहून घाबरला अजय देवगणचा मुलगा.
विकासाचा ‘संगमनेर पॅटर्न’ महाराष्ट्रालाही अनुकरणीय – आमदार थोपटे

जर आपल्या जीवनात थोडे सावकाशपणे जाणून घेतले तर आपण या दोनच गोष्टीत जगत असतो. म्हणजे एखाद्या कार्यात यश मिळाले तर आपण खूश होतो, आनंदित होतो, गगनाला स्पर्श केल्यासारखे वाटते.. आणि एखाद्या कार्यात आपण अपयशी ठरलो, तर आपण दुःखी होतो, निराश वाटते, सारे निरर्थक असल्यासारखे वाटते.. वैगरे वैगरे.. “हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग आहे”, असं आपण सर्वांच्या तोंडून ऐकतच असतो. “मी मागे आहे आणि मला पुढे जायचंय”, यासाठीच सर्वजण एखादे काम करत असतात. आपणही अजाणतेपणाने दुसऱ्या सोबत आपली तुलनाच करत असतो,  की “आज तो किती पुढे आहे आणि मी कुठे आहे”. एखाद्याने जीवनात काही साध्य केले आहे, काही मिळवले आहे, तर दुनियाही त्याची वाहवा करते, त्याचे उदाहरण दुसऱ्यांना देते, त्याला डोक्यावर चढवते आणि अजून बरेच काही… आणि कोणी जीवनात अजूनतरी काही साध्य  केले नसेल.. तर दुनिया त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही…

                   जीवनात साध्य करणे, यश मिळवणे म्हणजे.. नाव, प्रसिद्धी आणि पैसा याच गोष्टी लोकांना माहित आहेत.. एखाद्या व्यक्तीकडे या तीनही गोष्टी असतील तर तो यशस्वी..

एखादा व्यक्ती मोठ्या कंपनीत चांगल्या पगारासोबत मोठ्या पदाला असेल, तर त्याला सर्वात किंमत असते. तसेच एखाद्या मोठ्या अभिनेत्या सोबत, एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत आपण फोटो  काढला तर आपल्याला हजारो लाईक मिळतील, आपलीही किंमत वाढेल.. सामान्य लोकांना फक्त इतकेच माहीत आहे. लोकांना काय फक्त दिसण्याशी मतलब.. कोणी नाव, प्रसिद्धी आणि पैसा जगाला दाखवले तरच तो महान.. मग त्याने हे सारे सरळ मार्गाने मिळवले असेल किंवा वाईट मार्गाने.. दुनियेला काय.. फक्त दिसण्याशी मतलब…

     मग आता प्रश्न असा पडतो की, यश मिळवू नये? अपयशी व्हावं? काहीच करू नये? घरीच बसून रहावं? तर असे अजिबातच नाही.. प्राणी फक्त अन्न खाऊन जगू शकतात.. पण विकसित झालेल्या मेंदूचा माणूसच.. योग्य तो विचार करू शकतो.

तर मग…..

काही मिळवण्याची अपेक्षा न ठेवून..

दुनिया काय म्हणेल हे लक्षात न घेऊन..

जिंकण्या-हरण्याच्या पलिकडे जाऊन..

यश अपयशाला सोडून देऊन..

केलेले एखादे आवडीचे काम…….

म्हणजेच सुख.. आनंद.. किंवा यश…..

                    मग यात आपल्याला अपयश जरी मिळाले तरी आपण त्यातून शिकून घेऊन पुढेच चालत राहू.. मग ते काम कुठलेही असू शकते, हस्तकला, चित्रकला, पाककला, शिवणकाम इ. काहीही.. आपलाच एखादा छंद..

असे काम.. जे करताना मजा येईल..

जे केल्याशिवाय चैन पडत नसेल..

जे करताना दिवसातला best time असेल..

जे करताना आपण आपले दुःख विसरून जाऊ..

असे एखादे काम..

                  अर्थात.. आपण आपल्याला आवडते ते काम केले.. आपला छंद जोपासला तर लगेच आपल्याला पैसे मिळणार नाहीत किंवा लगेच कोणी ते देणारही नाही. म्हणून सुरुवातीला आपल्याला जपून पाऊले उचलावी लागतील, सुरुवातीला न आवडीच्या कामासोबतच आपल्याला, आपले आवडीचे काम करावे लागेल. पण योग्य बुद्धीने, योग्य विचाराने, व्यवस्थितपणे एखादे आवडीचे काम आपण करत राहिलाे… तर त्या कामात यश आपल्याला नक्कीच नक्की मिळेल आणि जरी अपयश मिळाले तरी आपण त्यातून शिकून घेऊन पुढेच चालत राहू.. म्हणजेच यश = अपयश.. आपल्याला दोघांचाही फरक पडणार नाही.. दाेन्हीही आपल्यासाठी समान राहतील.. फक्त ते काम करण्याचा आनंद असेल, सुख असेल.. मग नाव, प्रसिद्धी आणि पैसा यामागे आपण पळणार नाही.. पण ते मात्र आपल्या मागे नक्कीच पळेल…..

योगेश रोकडे नाशिक – 9422892198

COMMENTS