Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहिले रक्ताने पत्र

राहुरी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे 35 दिवसांपासून आंदोलन

राहुरी/प्रतिनिधी ः येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ता

कोपरगाव-शिर्डीत एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले (Video)
कोरोनाचा उद्रेक ! पारनेरमध्ये 52 विद्यार्थी बाधित
राहाता कृउबा समितीत कोल्ड स्टोरेजसाठी 11 कोटी

राहुरी/प्रतिनिधी ः येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विनंती केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांना गेल्या 35 दिवसां पासून आंदोलन पुकारले आहे.
आपल्या विविध मागण्या मान्य कराव्यात म्हणून विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत .आज कृषी विद्यापीठातील मुख्य इमारती प्रशासकीय इमारती आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून विनंती केली आहे. या पत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, कृषि अभियंते आज स्वतः च्या रक्ताने आपल्याला पत्र देऊन विनंती करता आहे की, साहेब आता तरी थोडं लक्ष कृषि अभियंत्यांकडे द्या, आमचे म्हणणे तरी ऐकून घ्या साहेब, आमच्या सोबत चर्चा तरी करा. सरकार कृषि अभियंत्यांच्या मरणाची वाट बघत आहे का? आतातरी सांगा साहेब??? कधी  न्याय देणार? मेल्या नंतर का साहेब? साहेब कृषि अभियंत्यांना न्याय द्या की जीव घेता का साहेब आता सांगा ना साहेब?? आई बापाला काय सांगू साहेब? की तुमच्या मुलंच भविष्य अंधारात घातलं?? आत काय करू सांगा साहेब?? न्याय देणार का साहेब? असा सवाल या विद्यार्थ्यांनी केला आहे.

COMMENTS