Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांवर मोफत उपचार करणार ः डॉ. अंजली फडके

कोपरगाव प्रतिनिधी ः खिर्डी गणेश येथील भास्कर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गरज पडल्यास त्या विद

रुणाल जरे याच्या अंगरक्षकाला दमबाजी l Rekha Jare Hatyakand l Bal Bothe I LOK News 24
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी ः खिर्डी गणेश येथील भास्कर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गरज पडल्यास त्या विद्यार्थ्यांचा उपचार इथून पुढे मोफत करणार असल्याचे डॉ. अंजली फडके यांनी सांगितले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भास्कर वस्ती येथे  भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डा.अंजली शेखर फडके विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
दिवंगत वसंत गणेश फडके यांनी या ठिकाणी बालवाडी सुरू केली होती, त्यासाठी त्यांनी जागाही मोफत दिली होती, आज त्या अंगणवाडीचे मोठ्या शाळेत रूपांतर झालेले पाहून खूप समाधान वाटले असे शिरिष फडके यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. शाळेसाठी सदैव मदत करण्याबरोबरच दरवर्षी इयत्ता चौथीतून पाचवी जाणारे एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी जे प्रथम क्रमांक घेतील त्यांना रोख पारितोषिके व संपूर्ण शाळेतून एक आदर्श विद्यार्थी यालाही दिवंगत वसंत गणेश फडके यांच्या स्मरणार्थ रोख बक्षीस देऊन दरवर्षी हे पुरस्कार देणार असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्योती पतसंस्थेचे संचालक वाल्मीक भास्कर होते तर सोसायटीचे चेअरमन चंद्रभान रोहोम, संजीवनी कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, ग्रामपंचायत सदस्य रमेश भास्कर, प्रतिश वराडे, नंदाताई रोहोम शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष विवेक भास्कर, उपाध्यक्ष मनोज तांबे सदस्य सुनीता वाघ, सोनाली भिवसेनआदीसह माता पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्व पालकांचे ग्रामस्थांचे व नागरिकांचा सहभाग असल्यामुळे शाळेची गुणवत्ता टिकून आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष वाल्मीक भास्कर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जयंत मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे उपाध्यापक सुकलाल महाजन यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी  शाळेच्या उपाध्यापिका ज्योती टोरपे उपाध्यापक महेंद्र विधाते, शालेय व्यवस्थापन समितीचे आजी-माजी सदस्य सर्वांनी प्रयत्न केले.

COMMENTS