Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी वाचली चार लाख पुस्तके

रूम टू रीड उपक्रम

 नाशिक - रूम टू रीड' आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे बालस्नेही नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमाचा हस्तांतरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहात

चांगले ‘निराशा बजेट’
नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कृष्णा कारखाना धावला..!
‘चोरमंडळ’ प्रकरणी संजय राऊत गोत्यात

 नाशिक – रूम टू रीड’ आणि जिल्हा परिषद यांच्यातर्फे बालस्नेही नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमाचा हस्तांतरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल गौतम यांचे अध्यक्षतेखाली नुकताच झाला.

‘रूम टू रीड’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांत राबविण्यात आलेल्या बालस्नेही ग्रंथालयांमार्फत सुमारे अडीच लाख शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे चार लाख पुस्तके वाचण्याची किमया केली.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे विभाग प्रमुख राजेश बनकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, ‘रूम टू रीड’चे राज्य समन्वयक राजा शेखर, ज्येष्ठ अधिव्याख्याता डी. डी. सूर्यवंशी, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी आदी उपस्थित होते. ज्येष्ठ अधिव्याख्याता शिवाजी औटी यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र उगले यांनी सूत्रसंचालन केले.

‘रूम टू रीड’चे जिल्हा समन्वयक यांनी वाचन चळवळीबाबत मार्गदर्शन केले. केंद्रनिहाय वाचन सुशोभीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील ३२७७ शाळेला दोन ज्यूट बॅग देण्यात आल्या. त्यामार्फत वयोगटनिहाय गोष्टींचे पुस्तके देण्यात आली.

‘रूम टू रीड’ उपक्रम

जिल्ह्यातील २१४ केंद्रात २०१७ पासून तीन टप्प्यात उप्रकम

पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्याथ्यांमध्ये वाचन आवडीसाठी प्रयत्न

 अडीच लाख विद्यार्थ्यांचा वाचन चळवळीमध्ये सहभाग

मराठी माध्यमासाठी ४ लाख गोष्टी पुस्तकांचे वाटप

 उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना १४ हजार पुस्तकांचे वितरण

COMMENTS