श्रीगोंदा प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार

श्रीगोंदा प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेवून नोकरीच्या शोधात न फिरता स्वतः उद्योग व्यवसाय करून नवीन रोजगार निर्माण करावे यासाठी महाविद्यालयातील वनस्पतीशास्र विभागाच्या वतीने द्वितीय वर्ष विज्ञान या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेट बुधवार 19 एप्रिल 2023 रोजी स्पिरुलींना लागवड आणी प्रशिक्षण केंद्र धनवट फार्म कारखान्याजवळ श्रीगोंदा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली होती.
या शैक्षणिक भेटीसाठी वनस्पती विभागप्रमुख डॉ. हरिभाऊ वाघीरे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भेटीचे आयोजन केले. या सहलीसाठी महाविद्यालयातील 45 विद्यार्थानी सहभाग घेतला होता. यावेळी धनवट फार्म चे मालक श्री प्रकाश धनवट यांनी स्पिरुलिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्पिरुलींना हे बीजीए शैवाल असून ते एकपेशीय वनस्पती वर्गात मोडते. या शैवाळापासून गोळ्या, बिस्कीट आणी सरबत इ.तयार करून त्याचा उपयोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जातो. धनवट यांनी स्पिरुलिनाची लागवड कशी करावी,पानिव्यवस्थापन कसे करावे पाण्याचे पीएच कसे राखावे काढणी कशी करावी याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच स्पिरुलीनाची पावडर बनवून आणी प्रत्यक्ष मशीन द्वारे गोळ्या तयार करून विद्यार्थाना दाखवले.श्री धनवट यांना या क्षेत्रातील 20 वर्षाचा अनुभव आहे आणी ते विद्यार्थ्यांना, संशोधकांना व शेतकर्यांना स्पिरुलिनाबद्दल प्रशिक्षण देतात. त्यांनी तयार केलेल्या स्पिरुलिनाच्या गोळ्या भारतभर वितरीत केल्या जातात. प्रश्न उत्तरामधे विद्यार्थ्यानी लागवड पॅकिंग व विक्री यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्याचे समाधानकारक उत्तर धनवट यांनी दिले. या सहलीसाठी प्रा.डॉ. संदीप इंगळे, प्रा. गोपाळ मगर, रायकर उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाचा वतीने डॉ. हरिभाऊ वाघीरे यांनी सर्वांचे आभार मानले.
COMMENTS