नाशिक- नाशिक येथील के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च च्या कॅम्पसमधील निवडक इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रत्
नाशिक- नाशिक येथील के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च च्या कॅम्पसमधील निवडक इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.१० आठवडे चालणाऱ्या या उपक्रमाचा कॅम्पस् अध्ययन व कॉर्पोरेट अंमलबजावणीदरम्यान कौशल्यामधील तफावत दूर करण्याचा आणि उद्योगासाठी सुसज्ज पदवीधर तयार करत मुलभूत क्षेत्रांमध्ये कुशल इंजीनिअर्सचा समूह वाढवण्याचा मनसुबा आहे.सुरूवातीला कॉलेजने निवडलेल्या १३ इंजीनिअरिंग विद्यार्थ्यांना एबीबी च्या नाशिक कॅम्पसमध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल.विद्यार्थ्यांना वरिष्ठ प्रमुखांचे देखील मार्गदर्शन मिळेल, जे प्रत्यक्ष त्यांच्या प्रगतीचे देखरेख देखील करतील.एबीबी इंडिया चा के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग एज्युकेशन अॅण्ड रिसर्चसोबत दीर्घकाळापासून सहयोग आहे आणि २०१७ पासून इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना नियमितपणे नियुक्त करत आहे. एबीबी इंडिया ने के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सोबत सहयोग केला आहे.आम्ही विद्यार्थ्यांना एबीबी नाशिक कॅम्पसमधून औद्योगिक स्थितीच्या व्यावहारिक पैलूंची माहिती मिळण्याची संधी देण्यासाठी एबीबी इंडिया चे आभार मानतो. एबीबी उद्योग अग्रणी असल्याने आमच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रातील सर्वोत्तम बाबींचे प्रशिक्षण घेण्याची आणि कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर उद्योगामध्ये सामील होण्याची संधी मिळेल,असे के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे प्राचार्य डॉ. केशव नंदूरकर म्हणाले.
COMMENTS