नाशिक प्रतिनिधी - राज्यात एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. मात्र दुसरीकडे कॉपी करु न दिल्याने विद्
नाशिक प्रतिनिधी – राज्यात एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे. मात्र दुसरीकडे कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांकडूनच शिक्षकावर हल्ला होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी करु न दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये घडली आहे. या दगडफेकीत शिक्षकाच्या डोक्याला आणि डोळ्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.
COMMENTS