Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नीट परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थी आक्रमक

राज्यभर विद्यार्थ्यांकडून आंदोलन आणि निदर्शने

मुंबई ः महाराष्ट्रात सध्या नीट परीक्षेतील गैरकारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतांना दिसून येत आहे. या परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पै

सचिन गुलदगड यांना कोपरगावमध्ये श्रध्दांजली
महिलेला मागितली एक कोटी खंडणी l DAINIK LOKMNTHAN
पुलवामा दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरले

मुंबई ः महाराष्ट्रात सध्या नीट परीक्षेतील गैरकारभारावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतांना दिसून येत आहे. या परीक्षेमध्ये 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, तसेच जास्त गुण मिळूनही रँकचा क्रमांक कमी दाखवणे अशा अनेक त्रुटी दिसून आल्या आहेत. त्याविरोधात सोमवारी राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत विविध शहरात आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली.
नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी नगरमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुक निदर्शने सुरु केली. छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकात नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आणि हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेत निषेध व्यक्त केला. प्रशासनाने नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आली आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आले, यामध्ये अनेक विद्यार्थी देखील सहभागी होते. निकालाची फेरतपासणी करून निकाल परत देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये नीट परीक्षेत घोटाळा केल्याचा आरोप करत हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नीट परीक्षा घेणार्‍या एनटीए विरोधात जोरदार घोषणाबाजी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला होता.

COMMENTS