अंबाजोगाई प्रतिनिधी - श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय गुरुवार पेठ, अंबाजोगाई येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्ष
अंबाजोगाई प्रतिनिधी – श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित घाटनागनाथ प्राथमिक विद्यालय गुरुवार पेठ, अंबाजोगाई येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हे साहित्य वाटप अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने- काळे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष व संस्थेच्या संचालिका सौ सुनीता मोदी , मुख्याध्यापिका श्रीमती अंजली जोशी, जोधप्रसादजी मोदी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. शाळेच्या सुरुवातीच्या दिवसात पालकांची आपल्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी खूप घाई असते. हे सर्व करतांना पालकांना आर्थिक तडजोड देखील करावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे आपल्या प्रास्ताविकात विनायक मुंजे यांनी सांगितले. सदरील कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या समृद्धी दिवाणे यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. तसेच सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपला सर्वांगीण विकास साधणे ही विद्यार्थ्यांची कसोटी आहे व यातच त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व दडलेले आहे म्हणून विद्यार्थ्यांनी खेळ, संगीत , साहित्य , त्याचबरोबर स्पर्धा परीक्षात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेण्याचे आवाहन समृद्धी दिवाने यांनी केले. वाढदिवस फक्त केक कापून फटाके फोडून आधुनिक पद्धतीने साजरा करून व्यर्थ पैसा खर्च करणे योग्य नसून तर हा पैसा योग्य कारणी लावावा असे सांगत , स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड प्रत्येकाने लावावे म्हणजे भविष्यातील वातावरणीय समस्या संपतील.ही जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे सांगत प्रत्येक विद्यार्थी व पालकांनी ’माझा वाढदिवस माझे झाड ’असा संकल्प करावा अशी भावनिक साद सौ मोदी यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना घातली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे कौतुक करत , मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करून यश संपादन करावे व पालकांचे, शिक्षकांचे व संस्थेचे नाव उज्वल करण्याचा सल्ला देखील मोदी विद्यार्थ्यांना दिला. जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. व्ही .गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे व शिस्तीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक टाकळकर , जोधा प्रसादजी मोदी मोदी माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक मुंजे सर यांनाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शैक्षणिक साहित्याचा वितरणानंतर अधिकारी समृद्धी दिवाणे यांचा वाढदिवसानिमित्त संस्थेच्या व घाटनागनाथ प्राथमिक विद्यालयाच्या वतिने सौ.सुनिताताई मोदी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली जोशी मॅडम यांनी शैक्षणिक साहित्य वितरण समारंभासाठी आलेल्या सर्व अतिथींचे स्वागत करून मा. समृद्धी दिवाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .तसेच विद्यार्थ्यांना आपणही असे गुणी व कर्तुत्ववान अधिकारी बनावयाचे स्वप्न बाळगावे यासाठी अभ्यासाची नियमितता ठेवावी लागेल असे विद्यार्थ्यांना सांगितले .सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलारी मॅडम तर प्रास्ताविक सोळंके मॅडम व आभार प्रदर्शन बलुतकर सर यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती लांडगे मॅडम, सोमवंशी सर, कुलकर्णी मॅडम कदम मॅडम, इंगळे मॅडम व गणेश यांनी सहकार्य केले.
COMMENTS