होमवर्क न केल्याने विद्यार्थ्याला केले अर्ध नग्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

होमवर्क न केल्याने विद्यार्थ्याला केले अर्ध नग्न

शिक्षकेविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी - क्लासचा होमवर्क न केल्याने शिक्षिकेने एका मुलाला अर्ध नग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे .याबाबत शिक्षिका वर जळगाव शहराती

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांशी साधणार संवाद
फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू
देवळाली प्रवरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात राडा

जळगाव प्रतिनिधी – क्लासचा होमवर्क न केल्याने शिक्षिकेने एका मुलाला अर्ध नग्न करून मारहाण केल्याची घटना घडली आहे .याबाबत शिक्षिका वर जळगाव शहरातील पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याबाबत शनी पेठेतील गुरुनानक नगरातील रहिवासी योगेश यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की,  माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला बळीराम पेठेत  क्लास लावलेला आहे ,मात्र  पल्लवी जितेंद्र इंदानी यांनी मुलाने होमवर्क न केल्याने त्याची शर्ट काढून मारहाण केली तसेच क्लास संपेपर्यंत मुलाला विद्यार्थ्यांसमोर उभे ठेवले.

COMMENTS