अहमदपूर प्रतिनिधी - लातूर शहरात गौवंशाची कत्तल प्रकरणी गौरक्षकांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन घटनास्थळी तपासणीला गेले असता पोलीस प्रशासनाच्या उपस
अहमदपूर प्रतिनिधी – लातूर शहरात गौवंशाची कत्तल प्रकरणी गौरक्षकांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन घटनास्थळी तपासणीला गेले असता पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत सुर्यिंसह राजपूत व अजय रेड्डी या गौरक्षकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात हे दोघेही गौरक्षक जबर जखमी झाले. हे मोबलिंचींग असून गौवंश हत्या व प्राणघातक हल्ला असे हे क्रूर कृत्य करणाा्शस समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाच्यावतीने उपजिल्हाधिका-यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्यात गौवंश कत्तल बंद कायदा लागू असतानाही बेकायदेशीर लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत व रस्त्यावर उघड्यावर मास विक्री सुरुच आहे. या विरोधात वेळोवेळी तक्रारी अर्ज व आंदोलन करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार बंद नाही झाल्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बजरंग दल अहमदपूरच्या वतीने अहमदपूर उपजिल्हाधिकारी, यांच्याकडे एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हा बजरंग दल जिल्हा संयोजक मधुकर धडे, हिंंदू जागरण मंचाचे विभाग प्रमुख अॅड. स्वप्नील व्हत्ते, प्रखंड मंत्री रवी कच्छवे, प्रखंड अध्यक्ष खंडेराव टिकोरे, प्रखंड संयोजक गजानन चंदेवाड, शहराध्यक्ष नरेशं यादव, शहर संयोजक सुदर्शन पाटील, अॅड.दत्ता कुमठेकर, खुशाल ढेले, संतोष जाधव, ओमकार पुणे, ईश्वर चापकानडे, सुरज होनराव, उमाकांत नागरगोजे, धनराज फुलमंटे, महंत क्षीरसागर अंकल, संजय नाईक, खंडोबा कोपनर, महादेव जायभाय, सचिन क्षीरसागर बाळू लोहकरे, ऋषीकेश मोरे, सचिन चोले, महेश केंद्रे, रामभाऊ टिकोरे, गजानन मुंडे यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते.
COMMENTS