Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनईमध्ये पाळला कडकडीत बंद

सोनई/प्रतिनिधी ः शेवगाव येथील अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द वापरून बदनामीकारक पोस्ट शेअर केली. या विधानाच

राहुरी तालुक्यातील वळणला गावठी कट्टा तर गंगापुरला तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांना अटक  
कर्जत-जामखेडसह इतरही ठेवीदारांसाठी रोहित पवार मैदानात
Balasaheb Thorat : भारतीय जनता पार्टीचा जनाधार म्हणजे केवळ नौटंकी

सोनई/प्रतिनिधी ः शेवगाव येथील अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह शब्द वापरून बदनामीकारक पोस्ट शेअर केली. या विधानाच्या निषेधार्थ काल सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गावातून निषेध मोर्चाकाढून कारवाई करण्याची मागणी करून सोनई पोलिस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. सकल हिंदू समाज, राष्टीय श्रीराम संघ, व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
        निवेदनात म्हटले की, शेवगाव येथील जिहादी वृत्तीच्या नराधमांने अखंड हिंदूंचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर टाकून औरंगजेबाची तुलना करून हिंदू मानवतेची मने दुखवल्याबद्दल कठोरात कठोर कारवाई करून नवीन याबाबद स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणावा, अशी मागणी केली आहे. शेवगाव येथील घटनेची तात्काळ मूळ शोधून तपास ज्यांनी हा मजकूर टाकला त्याच्यावर कारवाई करावी. या घटनेचा निषेध म्हणून काल (14 मार्च) 12 वाजेपर्यंत सर्वांनी बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित यांनी ’जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी  घोषणाने परिसर दणाणून गेला. दरम्यान गावांत काही ठिकाणी तुरळक प्रमाणात चहाची हॉटेल काही तास सुरू होती.

COMMENTS