Homeताज्या बातम्यादेश

दोषींवर कठोर कारवाई करणार ः पंतप्रधान मोदी

बालासोर/वृत्तसंस्था ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतल

विकासाला मारक ठरणार्‍यांना रेड कार्ड दाखवले- पंतप्रधान मोदी
नवीन संसद आत्मनिर्भरतेची साक्ष बनेल – पंतप्रधान मोदी
मोदींनी भाजपची कमान हाती घेतल्यापासून पक्षाने मागे वळून पाहिले नाही… अमित शहांची स्तुतीसुमने

बालासोर/वृत्तसंस्था ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी कटक रूग्णालयात पोहोचून जखमींची प्रकृती जाणून घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेत जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे स्पष्ट केले.
माध्यमांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ’हा एक अतिशय वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा अपघात आहे, हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, देव सर्वांना बळ देवो जेणेकरून ते दुःखाच्या वेळी मात करू शकतील. या दु:खाच्या वेळी सरकार मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहे.’ या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, रेल्वेने बचाव कार्य आणि रेल्वे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आम्ही आमच्या व्यवस्थेला अधिक प्राधान्य देऊन पुढे जाऊ. तत्पूर्वी, अपघाताच्या ठिकाणी पीएम मोदींनी सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी एकजुटीने काम करण्यास सांगितले. घटनास्थळावरून पीएम मोदी मोबाइल फोनवर बोलताना दिसले, पंतप्रधानांनी थेट कॅबिनेट सचिव आणि आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी फोनवर चर्चा केली. लोकांना चांगली सुविधा मिळावी, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. जखमींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी अधिकार्‍यांना दिले. अपघाताचा संयुक्त तपास अहवाल समोर आला असून, त्यात या भीषण घटनेमागे सिग्नलशी संबंधित बिघाड समोर आला आहे.

COMMENTS