परभणी प्रतिनिधी; जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किनच्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालतल्यामुळे खरिप पिकाचा हातातों
परभणी प्रतिनिधी; जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किनच्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालतल्यामुळे खरिप पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजावरील संकटात काही कमी होत असतानाच आता पुन्हा शेतकऱ्यांवर वेगळं विचित्र संकट आलं आह़े. परभणी(parbhani) मधील सेलु तालुक्यातील शिराळा या गावामधील एका शेतकऱ्यावर विचित्र आणि तितकेच भयानक संकट आलं आहे. शेतकऱ्याच्या बैलांची जीभ रात्रीत रक्तस्राव होत गळून पडल्याच्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिराळा गावातील जवळपास अकरा बैलांची जीभ गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आह़े.
COMMENTS