Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यक्षेत्रातील ऊस सोडून इतरत्र टोळ्यांची हलवा-हलवी थांबवा; अन्यथा आंदोलन; कारखानदारांना स्वाभिमानाचा इशारा

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील अनेक गावातून ऊस अजून तसाच असताना काही कारखानदार कार्यक्षेत्र सोडून इतरत्र टोळ्या हलवा-हलवीचे उद्योग करीत असल्याचे न

महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा
सातारा जिल्ह्यात निवडणूकीचे वारे; जिल्हा बँकेच्या निमित्ताने व्ह्यूरचनेस प्रारंभ
महावितरणच्या अधिकार्‍यांची मनमानी; थकबाकी वसूलीसाठी संपूर्ण विज पुरवठा बंद

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील अनेक गावातून ऊस अजून तसाच असताना काही कारखानदार कार्यक्षेत्र सोडून इतरत्र टोळ्या हलवा-हलवीचे उद्योग करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अगोदर कार्यक्षेत्रातील ऊस संपवा व नंतर बाकीचे बघा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी दिला.
गोपूज येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य प्रवक्त अनिल पवार, अ‍ॅड. प्रमोद देवकर, सचिन पवार, श्रीकांत लावंड, सूर्यकांत भुजबळ, तानाजी देशमुख, बंडा पाटील, जालिंदर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दत्तात्रय घार्गे म्हणाले, खटाव तालुका कार्यक्षेत्र असणारे कारखाने येथील ऊस ठेवून वाई तालुक्यातील ऊस तोडण्यासाठी टोळ्या पाठविल्या असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तेथील ऊस तोडण्यास आमची हरकत नाही. मात्र, येथील शेतकर्‍यांचा ऊस तसाच ठेवून तिकडे टोळ्या पाठविण्याचे नेमके काय गमक आहे. याचा उलगडा स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार आहे. खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत कारखानदारांनी न पाहता येथील ऊस वेळेत तुटण्यासाठी वेळप्रसंगी टोळ्यांची वाढ करावी. तसेच शेतकर्‍यांची ऊस तोडणीसाठी होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने तोडणी मुकादम व चिट बॉय यांच्यावर नियंत्रण व नियोजन ठेवावे, असेही घार्गे म्हणाले.

अन्यथा गेटकेनचा ऊस रोखणार
जरंडेश्‍वर कारखान्याने खटाव तालुक्यात टोळ्या उपलब्ध करून घ्याव्यात. कार्यक्षेत्रातील उसाला तोडी द्याव्यात अन्यथा ऊस वाहतूक रोखावी लागेल, असा इशारा राज्य प्रवक्त अनिल पवार यांनी दिला आहे.


साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी
काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व साखर आयुक्तांच्या झालेल्या बैठकित प्रथम कार्यक्षेत्रातील नोंदीचा व बिगर नोंदीचा ऊस प्राधान्याने तोडावा. मगच कार्यक्षेत्राबाहेरच्या उसाला तोडी द्याव्यात, असा आदेश असून त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे संघटनेचे तानाजी
देशमुख यांनी सांगितले.

COMMENTS