तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे त्वरितादेवी गडाच्या पायथ्याशी तलवाडा गावात प्रवेश करत असतांना तलवाडा पंचक्रोशीतील आसपासच्या सर
तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे त्वरितादेवी गडाच्या पायथ्याशी तलवाडा गावात प्रवेश करत असतांना तलवाडा पंचक्रोशीतील आसपासच्या सर्व गावे व वाड्या वस्ती तांडे येथील शिवप्रेमी समाज बांधवांच्या भावनात्मक विचारधारा व प्रेरणेतुन छत्रपति शिवाजी महाराज चौकाचे भव्यदिव्य बांधकाम करण्यात आलेले असुन या ठिकाणी विविध व्यावसायिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध व्यवसाय करतात. यामुळे दोन्ही बाजुने भरमसाठ वाहने मोटरबाईक थांबत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी आणेक वाहने तासंतास चौकात नंबर लाऊन थांबत असल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होतात. यातुन अपघात होण्याची शक्यता जानकारातुन वर्तवली जात आसल्याने या ठिकाणी थांबणारी व्यावसायिक वाहने तलवाडा पोलीसांनी कायमस्वरूपी ईतर ठिकाणी थांबवावी आस्या प्रकारची मागणी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे तलवाडा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनी शंकर वाघमोडे साहेब यांच्या कडे केली असुन या निवेदनावर अनिकेत नाटकर, सुरज जैत, ऋषिकेश हात्ते, धनंजय श्रावणे, आकाश शिंदे, माऊली वादे, गोपाळ शिंदे, सोमेश्वर नाटकर,अनंता बहिर,अक्षय मोरे, सह पदाधिका-यांच्या स्वाक्षर्या आहेत.
COMMENTS