देवळाली प्रवरा ः नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून, महामार्गावरील जड वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळवावी व महामार्गावरील खड्डे ता
देवळाली प्रवरा ः नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून, महामार्गावरील जड वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वळवावी व महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवावे. 31 आँगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 1 सष्टेबरपासून राहुरी मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद करण्याचा निर्णय राहुरी कारखाना येथे झालेल्या लढा नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक घेण्यात आला आहे.
राहुरी कारखाना येथिल योगा भवन येथे नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती विचार विनिमय करण्यासाठी सर्व पक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सर्व पक्षीयच्या वतीने निर्ण घेण्यात आला. या बैठकीस लोणीच्या प्रभावती घोगरे,माजी.आमदार.भाऊसाहेब कांबळे, माजी.नगराध्यक्ष सत्यजित कदम,धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे राजूभाऊ शेटे,दिपक त्रिभुवन,मनसे नेते नितीन कल्हापुरे,कृती समितीचे वसंत कदम,शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे,सुनिल विश्वासराव, अनिल येवले, संदीप कोठुळे उपस्थित होते. या प्रसंगी नगर मनमाड रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्रभावती घोगरे यांनी आपली भुमिका मांडताना सांगितले की,कृती समिती या पुढे जो निर्णय घेईल त्या निर्णया सोबत राहता तालुक्यात नागरिक सहभाग नोंदवतील. राजूभाऊ शेटे यांनी कृती समितीच्या लढ्यामुळे महामार्गाचे आंदोलन देशात पोहोचल्याचे सांगितले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेण्यासाठी नागपूरला समितीच्या सदस्यांना घेवून जाण्यासाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले.सत्यजित कदम यांनी महामार्गाच्या आंदोलना मध्ये कोणीही राजकारण न आणता सर्व सामान्यांचा लढा म्हणून सहभाग नोंदवावा.कृती समितीच्या सदस्यांना वरिष्ठ मंत्र्यांची भेट घ्यायची असल्यास नियोजन करण्यात येईल असे सत्यजित कदम यांनी सांगितले.
यावेळी सर्व पक्षीय बैठकीत नगर मनमाड महामार्गाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी.अवजड वाहतुकीमुळे महामार्गावरील बुजवलेले खड्डे पुन्हा तयार होतात. झालेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत.कोल्हार ते नगर रोज अनेक तरुण औद्योगिक वसाहत येथे कामानिमित्त जात असतात.या खड्ड्यांमुळे शेकडो तरुणांचे व प्रवाशांचे प्राण गेलेले आहेत.त्यामुळे नगर मनमाड महामार्गाच्या दोन्ही बाजूचा एकेरी रस्ता दुरुस्त करावा व जो पर्यंत महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत अवजड वाहतूक बंद करण्यात यावी.अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी आदी मागण्या मान्य न झाल्यास 1 सप्टेंबर 2024 रोजी नगर मनमाड महामार्ग जोडणार्या राहुरी येथील मुळा नदीवरील पुलावर बेमुदत रस्ता बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी राजेंद्र बोरुडे, प्रशांत मुसमाडे, वैभव गिरमे, अनिल येवले, सुहास महाजन, शिवाजी घाडगे, दिपक त्रिभुवन, शिवचरित्रकार हसन सय्यद, वैभव गाढे, धनंजय विटनोर, ज्ञानेश्वर मोटे, माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम, प्रशांत काळे, विजय पेरणे, नितीन कल्हापुरे, वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके, माजी नगरसेवक आदिनाथ कराळे,शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, सुनिल विश्वासराव आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन वसंत कदम यांनी केले.
जिल्हाधिकार्यांना रस्त्यावर थांबविले – शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांचा दौरा नगर-मनमाड महामार्गावरून जात असतांना रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या सदस्यांनी राहुरी कारखाना येथे थांबवत जिल्हाधिकारी यांना महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत पत्र दिले. तसेच महामार्गावरील आत्तापर्यंत झालेल्या अपघातांमुळे शेकडो कुटुंब उध्वस्त झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी चर्चेत सत्यजित कदम, देवेंद्र लांबे, वसंत कदम, आदिनाथ कराळे, सुनील विश्वासराव, प्रशांत मुसमाडे, प्रशांत काळे, वैभव गाढे यांच्यासह समितीचे सदस्य सहभागी झाले होते.
आमदार तनपुरे यांचा व्हिडीओ काँलद्वारे बैठकीत सहभाग – नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झालेली आहे.रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरु आहे. खा.निलेश लंके यांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून होणार्या प्रत्येक प्रक्रियेत सक्रीय सहभाग असेल असे मा.मंत्री तथा आ.प्राजक्त तनपुरे यांनी व्हिडीओ काँलद्वारे सहभागी होवून बैठकीला जमलेल्या सदस्यांबरोबर संवाद साधला.
COMMENTS