Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावणेसहा कोटींचा चोरीस गेलेला मुद्देमाल नागरिकांना परत

पुणे/प्रतिनिधी ः पोलिसांच्या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळला गेला पाहिजे. पोलिसांना आवश्यक आत्याधुनिक शस्त्र, साधने पुरवली गेली पाहिजे. त्याचसो

संजीवनीच्या अनुष्का उंडेचा नवा विक्रम
परदेशातून येणार्‍या प्रवाशांना सक्तीचं क्वारंटाईन | DAINIK LOKMNTHAN
रामनवमी शोभायात्रेत झळकला नथुराम गोडसेचा फोटो

पुणे/प्रतिनिधी ः पोलिसांच्या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळला गेला पाहिजे. पोलिसांना आवश्यक आत्याधुनिक शस्त्र, साधने पुरवली गेली पाहिजे. त्याचसोबत पोलिसांच्या घराकडे आणि मुलांच्या शिक्षणाकडे सर्वांनी सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. पोलिस कॉलनीतील दूरावस्था सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुणे पोलिस दलातर्फे तब्बल पावणेसहा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरण सोहळा शिवाजीनगर मुख्यालय याठिकाणी सोमवारी पार पडला. यावेळी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे)रामनाथ पोकळे ,अप्पर पोलिस आयुक्त पश्‍चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अभिनव कार्यक्रम हा असून चोरी होऊन त्याचा शोध लागतो. त्यानंतर न्यायालयात मुद्देमाल जमा होऊन तो परत पोलिसांना न्यायालयाकडून दिला जातो. पोलिसांकडून हे मौल्यवान दागिने नागरिकांना परत मिळतात.याबद्दल चांगले काम केल्याबद्दल पोलिस अधिकारी यांचे कौतुक केले पाहिजे. एखादा गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजे. गुन्हा टाळणे यासाठी सर्वांचे सहकार्य आणि तत्परता असली पाहिजे. गुन्हा घडला की त्याचा शोध लागून दोषींना शिक्षा होणे महत्वाचे असून त्यामुळे समाजात कायदा आणि सुव्यासथा टिकून राहील. रितेश कुमार म्हणाले, कष्टाने कमावलेले दागिने पळवून नेल्याने दुःख होते. अशा परिस्थितीत गुन्हे उघडकीस आण्यासाठी जिकरीचे प्रयत्न पोलिस करत असतात. पावणे सहा कोटी रुपयांचे पुणे शहरात चोरीस गेलेले दागिने आज करत करण्यात येत आहे.

COMMENTS