मुंबई : दिवाळीनंतर शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता होती, मात्र सोमवारी शेअर बाजार उघडताच अनेकांचा कोट्यावधी रूपयांचा चुराडा झाल्याचा दिसून आले.
मुंबई : दिवाळीनंतर शेअर बाजारात तेजी येण्याची शक्यता होती, मात्र सोमवारी शेअर बाजार उघडताच अनेकांचा कोट्यावधी रूपयांचा चुराडा झाल्याचा दिसून आले. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक जोरदार घसरल्याने पहिल्या पंधार मिनिटांत गुंतवणुकदारांचे तब्बल 7 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्स सकाळी साडेदहा वाजता 78,614 म्हणजेच 1,109 पॉईंटनी खाली आला होता. तर निफ्टी 366 पॉईंटने खाली येत 23938 अंकांवर आला होता. यामुळे सगळ्याच कंपन्यांचे मार्केट कॅप 6.8 लाख रुपयांनी खाली आले होते. त्यामुळे दिवाळीनंतर अनेकांचे शेअर बाजारात दिवाळे निघाले अशीच परिस्थिती दिसून येत होती.
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 24 शेअर्स घसरणीसह आणि 6 शेअर्स वाढीसह बंद झाले. याशिवाय निफ्टीमधील 50 शेअर्सपैकी 42 शेअर्स घसरले आणि केवळ 8 शेअर्स वाढीसह बंद झाले. अदानी पोर्ट्समध्ये सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 3.23 टक्क्यांची घसरण झाली. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 3 टक्के, सन फार्मामध्ये 2.68 टक्के, बजाज फिनसर्व्हमध्ये 2.53 टक्के आणि एनटीपीसीमध्ये 2.45 टक्के घसरण झाली. तर महिंद्रा अँड महिंद्रा आणि टेक महिंद्रा जवळपास 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
अमेरिकेच्या निवडणुकीमुळे अस्वस्थता
अमेरिकेत आज मंगळवार 5 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष निवडण्यासाठी मतदान होत आहे. माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि विद्यमान उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यातील चुरशीच्या शर्यतीचे परिणाम जगभरातील बाजारपेठांना जाणवत आहेत. आयोवा येथे करण्यात आलेल्या एका नवीन सर्वेक्षणात अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीमुळे शेअर बाजारात देखील अस्वस्थता दिसून येत आहे.
COMMENTS