Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोदार लर्न स्कूलची ‘डीएसओ’ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील वेंकटेश पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथे दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या डी.एस.ओ. पुणे विभाग

कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी खेंडके 
शेतकऱ्याचा कांदा एक रुपया किलो !

श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील वेंकटेश पोदार लर्न स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथे दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या डी.एस.ओ. पुणे विभागीय शास्त्रांग मार्शल आर्ट स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सम्राटराजे पाचपुते याने सुवर्णपदक पटकावले. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात ईशा गोरे हिने सुवर्णपदकावर नाव कोरले. वेदश्री ढवळे व मृणाली सावंत यांनी रौप्यपदक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या यशामागे क्रीडा शिक्षक बाबू बळे यांचे मार्गदर्शन, नियोजन आणि कठोर परिश्रम मोलाचे ठरले. शाळेचे संचालक आनंद शहा व सर्व विश्वस्त सदस्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेत शाळेचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS