देवळाली प्रवरा प्रतिनिधी - डाँ.तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही केली. परंतू कामगारांना वाऱ्यावर सोडल्याची
देवळाली प्रवरा प्रतिनिधी – डाँ.तनपुरे कारखान्यावर जिल्हा बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही केली. परंतू कामगारांना वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी व कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना कामगार युनियनच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी यांना कामगार युनियनच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्या कडून कर्जाची वेळेत परतफेड न झाल्यामुळे व आपले पुर्न:गठण कराराचा भंग झाल्यामुळे शनिवार दिनांक रोजी सर्वांसमक्ष कारखाना सील (जप्त) केलेला आहे.बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये कामगारांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
कामगारांनी युनियनची शनिवारी स्वतंञ बैठक घेवून बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांना निवेदन देवून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने कारखाना परीसर व कामगार वसाहतीसाठी व कारखान्याचे संरक्षणाचे दृष्टीने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी कामावर ठेवण्यात यावे.बँकेने कारखाना सुरु करण्याचे दृष्टीने जो प्रयत्न करणार असल्यास खाजगी करणातून कारखाना निविदेद्वारे चालविण्यास देताना कामगारांची सर्व थकीत रकमांचा उल्लेख (अंतर्भाव) करण्यात यावा. कारखाना चालविण्यास घेईल त्यास कारखाना कायम कामगारांना कामावर घेण्याचे बंधनकारक राहील.अशी अट निविदा प्रक्रीयात समाविष्ठ करावी.बँकेने निविदा प्रक्रिया लवकरात लवकर आमलात आणून सर्व कारखाना कामगारांची होणारी उपासमार टाळून सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरु करावा अशा मागण्या बँकेकडे करण्यात आल्या आहेत.
डाँ.तनपुरे कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना कामगार युनियनच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे 1 नोव्हेंबर पासून कामगार युनियन व कारखाना व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेप्रमाणे 50 टक्के पगारावर सर्व कायम कर्मचाऱ्यांना ले-ऑफ देण्यांत यावा.23 आँक्टोबर रोजी झालेल्या चर्चेप्रमाणे कामगारांचा थकीत पगारापैकी दरमहा 1 पगार व ले-ऑफ कालावधीतील 50 टक्के 1 पगार करण्यात यावा. कारखान्यातील अत्यावश्यक सेवेतील कामगार कामावर घेण्यांत यावे व त्यांचा पगार दरमहा वेळेत मिळावा.अत्यावश्यक सेवेतील कामगारांपैकी ज्यांचे काम संपले असेल अशा कामगारांना तातडीने ले-ऑफ देण्यात यावा. कामगार वसाहत व कारखाना परीसरात सुरु असलेला वीजप्रवाह व पाणीपुरवठा निरंतर सुरुच ठेवावा.अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी यासाठी युनियन अध्यक्ष गजानन निमसे, उपाध्यक्ष अर्जुन दुशिंग, सेक्रेटरी-सचिन काळे, सदस्य सिताराम नालकर ,बाळासाहेब तारडे, सुरेश थोरात, इंद्रभान पेरणे,राजेंद्र गागरे, ईश्वर दूधे आदींसह विविध विभागातील कामगार उपस्थित होते.
COMMENTS