Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आव्हाड महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंचे राज्यस्तरीय वेटलिफ्टींग यश

पाथर्डी : जिल्हा क्रीडा संकुल,बारामती येथे महिलांच्या युथ, ज्युनियर व सिनियर वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या

सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी : लोककला पथकांचा जागर सुरू
ध्रुव ग्लोबलच्या जलतरणपटूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
संत कवी महिपती महाराजांच्या फिरता नारळी हरिनाम सप्ताहास सुरूवात

पाथर्डी : जिल्हा क्रीडा संकुल,बारामती येथे महिलांच्या युथ, ज्युनियर व सिनियर वयोगटाच्या राज्य अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या महिला खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले. या स्पर्धेत सिनियर गटात कु.योगिता खेडकर हिने 87 किलो वजन गटामध्ये एकूण 178 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावले तर कु.हर्षदा गरुड हिने 45 किलो वजन गटात एकूण 158 किलो वजन उचलून रौप्य पदक पटकावले.तर कु.पूनम काकडे हिने 71 किलो वजन गटात 151 किलो वजन उचलून युथ गटात रौप्य पदक तर ज्युनियर गटात कांस्य पदक पटकावले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभा खासदार मा. सुनित्राताई पवार यांच्या शुभहस्ते झाले.या यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे व पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ड.सुरेशराव आव्हाड,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बबन चौरे,अहमदनगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुभाष देशमुख,उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे यांनी अभिनंदन केले.त्यांना जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. विजय देशमुख यांचे मार्गदर्शन मिळाले.

COMMENTS