कोपरगाव : राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धा २०२६ चा उद्घाटन समारंभ गुरुवारी (दि. ७) सकाळी एस.एस.जी.एम.कॉलेज, कोपरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरण

कोपरगाव : राज्यस्तरीय सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धा २०२६ चा उद्घाटन समारंभ गुरुवारी (दि. ७) सकाळी एस.एस.जी.एम.कॉलेज, कोपरगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अहमदनगर डिस्ट्रिक्ट अॅथलेटिक असोसिएशन व एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे.
या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन सब-ज्युनिअर मैदानी स्पर्धा समितीचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या हस्ते झाले. या मैदानी स्पर्धांसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे यांनी शुभेच्छा संदेश पाठवले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आपल्या मनोगतातून क्रीडाशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना शिस्त, परिश्रम व सातत्य यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असे मत व्यक्त केले. खेळभावना जोपासली गेली तरच उत्तम खेळाडू घडतो, असे सांगत त्यांनी खेळभावनेस चालना दिली.
उद्घाटन समारंभास महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतीश उचील, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी प्रा. सुनील जाधव, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक कार्याध्यक्ष रंगनाथ डागवाले, अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण यशवंत चंद्रे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य श्री. संजय शिंदे, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विशाल पवार, सुनील कदम कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक महाराष्ट्रातून आलेले विविध जिल्ह्यातून क्रीडाशिक्षक आणि खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव दिनेश लक्ष्मण भाटेगाव तसेच कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

COMMENTS