Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य महिला आयोगाची चित्रा वाघ यांना नोटीस

मुंबई/प्रतिनिधी ः अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ टीका करत असतांना त्यांनी राज्य महिला आयोगाला

पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
कोल्हापूरसह कोकणात पावसाचा हाहाकार
सातारा जिल्ह्यात वळीवाच्या पावसाचा तडाखा

मुंबई/प्रतिनिधी ः अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ टीका करत असतांना त्यांनी राज्य महिला आयोगाला देखील मधे ओढत त्यांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवण्याचे धाडस दाखवावे असे म्हटले होते. यावर शुक्रवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत जोरदार टीका केली असून, चित्रा वाघ यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, चित्रा वाघ यांनी काल अभिनेत्री तेजस्विनी पंडीतला नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. मात्र ही नोटीस अनुराधा मालिकेचे दिग्दर्शक संजय जाधव यांना पाठवण्यात आली होती. याबद्दल त्यांनी खुलासेही केले होते. चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची अप्रतिष्ठा केली आहे. आयोगाबद्दल अविश्‍वास निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी केले आहे.त्यामुळेच आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी राज्य महिला आयोग चित्रा वाघ यांना नोटीस पाठवत आहे, यावर दोन दिवसांत खुलासा करावा दोन दिवसांत खुलासा केला नाही तर कोणतेही म्हणणे नाही म्हणून महिला आयोग एकतर्फी कारवाई करेल, असा ईशारा त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर चित्रा वाघ संजय राठोड प्रकरणात तोंडावर पडल्या, रघुनाथ कुचिक प्रकरणात तोंडावर पडल्या. पोलिसांना भेटायला गेल्या मात्र पोलिसांनीही त्यांच्या बालिशपणाची दखल घेतली नाही. गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असूनही दखल घेतली जात नाही, हा त्यांचा बालीशपणा आहे, अशी टीकाही रुपाली चाकणकर यांनी केली आहे. भाकरीच्या प्रश्‍नावर महाराष्ट्र प्रश्‍न विचारतोय आणि तुम्ही कपड्यांवर बोलत आहात, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

COMMENTS