Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडे उपकालव्यांचे काम सुरू करून बंधारे भरून द्या

कालवा कृती समिती समितीची जलसंपदामंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

कोपरगाव/प्रतिनिधी ः निळवंडेच्या धरणाच्या लाभक्षेत्रातील डाव्या कालव्यावरील कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच उपकालवे अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपू

आमदार मोनिका राजळे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व कायम
अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला आघाडीकडून महिलादिन उत्साहात

कोपरगाव/प्रतिनिधी ः निळवंडेच्या धरणाच्या लाभक्षेत्रातील डाव्या कालव्यावरील कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच उपकालवे अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे.या दुष्काळी टापुतील शेतकर्‍यांना दुष्काळातून वाचविण्यासाठी या चार्‍या आणि वरील कामांची निविदा प्रसिद्ध करून सदर कामे तातडीने पूर्ण करुन त्या भागातील पाझरतलाव, साठवण बंधारे,बंडीग,कोल्हापूर पद्धतीचे बंधार्‍यात पाणी सोडून कोपरगाव, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना आपले चारा पिके घेण्यासाठी व पशुधन वाचविण्यासाठी जलसंपदा विभागाने कारवाही करावी अशी महत्वपूर्ण मागणी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते रंगनाथ गव्हाणे यांनी एका निवेदनाद्वारे नुकतीच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे.
गव्हाणे यांनी म्हटले आहे की, उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे प्रकल्प व कालवे पूर्ण करण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत रुपेंद्र काले व पत्रकार नानासाहेब जयराम जवरे यांनी समितीच्या माध्यमातून वारंवार आंदोलन करत याचिका दाखल केली होती. तसेच सरकारच्या वतीने सहा वेळेस मुदतवाढ घेवून प्रकल्प पूर्ण केला नाही, याबाबची बाब कालवा कृती समितीने 18 जानेवारी 2023 रोजी उच्च न्यायालयाच्या हि बाब लक्षात आणून दिली होती. त्या वेळी उच्च न्यायालयाचे न्या.रवींद्र घुगे व न्या.संजय देशमुख यांनी सरकारला वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत सक्त ताकीद दिली होती. व न केल्यास आर्थिक अधिकार गोठविण्याचा इशारा दिला होता.मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले होते.त्यामुळे अखेर निळवंडे कालवा कृती समितीच्या जनहित याचिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला मुदतीत प्रकल्प पुर्ण न केल्याने दि.13 जुलै 2023 रोजी अवमानना नोटीस काढली व जलसंपदा विभागाचे आर्थिक अधिकार गोठवले आहे.तसेच अकोले तालुक्यातील चाचणीत डाव्या कालव्यांची मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होऊन अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याने त्याची नागपूर येथील,’पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ यांच्या तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली आहे.दरम्यान त्यास उत्तर देण्यासाठी 28 जुलै हि अंतिम तारीख ठेवली होती त्यात जलसंपदा विभागाने 18 पानीं उत्तर दिले असून त्याची सुनावणी नुकतीच 14 सप्टेंबर 2023 रोजी संपन्न झाली आहे. त्यात शेतकर्‍यांना मोठया अपेक्षा आहेत. दरम्यान या निवेदनावर निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे, कार्याध्यक्ष मच्छीन्द्र दिघे, सचिव कैलास गव्हाणे, सुखदेव खालकर, नबाजी भागवत, नवनाथ भागवत, चांगदेव भागवत,नामदेव भागवत,रामदास भागवत, नामदेव बाळू भागवत, विश्‍वनाथ भागवत, सुभाष दिघे, प्रल्हाद भागवत, सुनील फटांगरे, सोमनाथ भागवत, रावसाहेब भागवत, केशव भागवत,महेश देशमुख,सचिन खालकर, अनिल गव्हाणे, अरुण वर्पे, सोमनाथ वर्पे, शिवाजी भागवत, काशिनाथ भागवत, आबासाहेब भागवंत, हरिभाऊ गोडगे,विलास गोडगे, चंद्रभान खालकर, सोमनाथ वर्पे, गजानन मते, एकनाथ भागवत, आदिसंह बहुसंख्य शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी – कोपरगाव व तळेगाव दिघे ब्रँच चार्‍या अजून जागोजागी मोठ्या प्रमाणावर अपूर्ण आहे. या दुष्काळी टापुतील शेतकर्‍यांना दुष्काळातून वाचविण्यासाठी या चार्‍या आणि वरील कामांची निविदा प्रसिद्ध करून सदर कामे तातडीने पूर्ण करणे व त्या भागातील पाझरतलाव, साठवण बंधारे, बंडीग, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आदीत पाणी सोडले तर शेतकर्‍यांना आपले पशुधन वाचविणे आणि चारा पिके घेणे सोपे होऊन दुष्काळ सुसह्य होणार आहे. त्यामुळे वरील कामे तातडीने हाती घेऊन त्याची निविदा निळवंडे कालवा कृती समितीच्या वरील जनहित याचिकेतील मागणी प्रमाणे पूर्ण होणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS