Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा

उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कोणत्याच पक्षाचा पायपोस लागतांना दिसून येत नाही. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे गटाचे प्र

मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते- उद्धव ठाकरे
सरकार मतपेटीतून यायचे आता खोक्यातून येतात
तर, देशातून लोकशाही गायब होईल – उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर कोणत्याच पक्षाचा पायपोस लागतांना दिसून येत नाही. या पार्श्‍वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे राज्यात संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

आज ठाकरे गटाची मातोश्रीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे विविध शहरांमध्ये जाऊन संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या बैठकीत सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीला कशा प्रकारे सामोरे जायचे, यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत समान नागरी कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. बाळासाहेबांची समर्थनार्थ भूमिका होती, यामुळे, ठाकरे गट कायद्याचा मसुदा काय आहे, हे पाहून भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे. मातोश्रीत झालेल्या बैठकीत नेमक्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावर भाष्य करताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, मउद्धव साहेबांनी दौरा करावा, अशा प्रकारचा आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचे आहे असे सातत्याने सांगत आहेत. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता, आता पाऊस बर्‍यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौर्‍यावर लवकरच बाहेर पडतीलफ. उद्धव ठाकरे मएकला चलो रेफची भूमिका घेणार का, यावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, मया प्रकारचा कोणताही विचार आणि अशी चर्चा बैठकीत कोणी केलले नाही. आमच्या महाविकास आघाडीत फूट पाडण्याकरिता भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहेत.

उद्धव ठाकरे हे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असणार आहे. सर्व नेत्यांनी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना सुद्धा या बैठकीत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर महाविकास आघाडीमध्ये राहायचे की नाही? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी या बैठकीत आमदार खासदार आणि इतर नेत्यांची मते जाणून घेऊन आपण यापुढे महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचा निर्णय ठाकरे गटाकडून या बैठकीत घेण्यात आला.

आम्ही महाविकास आघाडीसोबतच ः भास्कर जाधव – राज्यात ज्या राजकारणात घडामोडी झाल्या त्यानंतर सर्व पक्ष बैठका बोलवत आहेत. यामध्ये आमच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीमध्ये ज्या घडामोडी घडल्यात त्याचा मतदारसंघांमध्ये नेमका काय इम्पॅक्ट होईल याबद्दल आढावा घेण्यात आला, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. आम्ही महाविकास आघाडी सोबतच आहोत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत, याची तारीख पक्षाचे सचिव ठरवतील मात्र हा दौरा 100 टक्के होणार आहे. आम्ही सुद्धा या दौर्‍यामध्ये सर्व ठिकाणी जाणार संघटना मजबूत करण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

मसुदा आल्यानंतरच समान नागरी कायद्याला पाठिंबा – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यामध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. समान नागरी कायद्यासंदर्भात ठाकरेंच्या या बैठकीत चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याला समर्थन दिले होते, पाठिंबा दिला होता. आमचा सुद्धा पाठिंबा याला असेल, मात्र जोपर्यंत या संदर्भातील मसुदासमोर येत नाही तोपर्यंत आमचा पक्ष भूमिका समोर ठेवणार नाही, असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS