संगमनेर ः संगमनेर तालुक्यामध्ये यावर्षी अनेक गटात फार कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट जाणवायला लागलेला आहे. ग्रामीण भागामध

संगमनेर ः संगमनेर तालुक्यामध्ये यावर्षी अनेक गटात फार कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट जाणवायला लागलेला आहे. ग्रामीण भागामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. संगमनेर तालुक्यात बहुतांश भाग हा दुष्काळी आहे. ग्रामीण भागामध्ये तातडीने सर्वे करून पाणीटंचाई दूर करावी. व ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. गावागावातील लोकसंख्येचा विचार करून त्या त्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय प्रशासनाने करावी. तालुक्यातील कुठलंही गाव या पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. तालुक्यातील सर्व गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या संबंधित अधिकार्यांना याविषयी निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, तालुका संघटक तुषार बढे, तालुका उपाध्यक्ष बजरंग घुले, युसूफ शेख,सतीश मिंडे, तालुका सरचिटणीस किरण पाचारणे, तालुका सचिव धीरज दिघे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
COMMENTS