Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

आमदार रोहित पवारांची ग्वाही ः रत्नदीप कॉलेजवर तक्रारींचा पाऊस

जामखेड ः रत्नदीपच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्‍न असून, त्यासाठी आपण मागे हटणार नाही, आणि झुकणार नाही. रोहित पवारला खिशात ठेवणारं  कोण

कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन
आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी

जामखेड ः रत्नदीपच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्‍न असून, त्यासाठी आपण मागे हटणार नाही, आणि झुकणार नाही. रोहित पवारला खिशात ठेवणारं  कोणीही अजून जन्मलेले नाही, मुलींनी तक्रार केलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याचे काही खरे नाही. कारवाई होणारच. रत्नदीपच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक जीवनाचा प्रश्‍न आहे, कोणीही राजकारण आणु नये. तसेच रोहीत पवार हा तुमचा मोठा भाऊ म्हणून आज आणि पुढेही तुमच्या बरोबर न्यायासाठी लढायला उभा आहे. तुमचे काँलेज ट्रान्सफर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. जामखेड कर्जतचे नागरिक चांगले आहेत म्हणूनच बाहेरगावच्या मूलमूलींच्या पाठीशी एकजूटीने उभे आहेत अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी रत्नदीपच्या उपोषणकर्त्यां मूलामूलींना देत आश्‍वस्त केले.
आमदार रोहित पवार रत्नदीपच्या उपोषणकर्त्यां मूलामूलींना भेटण्यासाठी 11 मार्च रोजी आले होते. यावेळी ते बोलत होते. आम्हाला काँलेज बदलून मिळाले नाही तर जीवनाचं बरं वाईट करू असा इशारा रत्नदीपच्या उपोषणकर्त्या काही मुलींनी दिला आहे. तसेच आम्ही मागच्यावेळी पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्ज पोलिसांकडून डॉ भास्कर मोरेकडे गेले. त्या तक्रारी अर्जावरून त्याने मुलींना खुप टार्चेर केले.जिथे पोलिसाकडुनच सुरक्षिततेच्या बाबी संभाळल्या जात नाहीत. तिथे आम्ही मुली कशा थांबणार. आम्हाला सुरक्षित वाटत नाही. काँलेजमध्ये कसलाही आभ्यास घेतला जात नाही. तरीही डिग्री अशीही भेटणार आहे फक्त पैसे भरा मोकळे व्हा. असे भास्कर मोरे मूलींना सांगतो. अन् सांगितले ते नाही केले तर…अशी धमकी मुलींना देतो. सिनियर मुलींकडून ज्युनिअर मुलींना जबरदस्तीने (वालिटीयर) शिकविण्यास भाग पाडले जाते. मुलींच्या हॉस्टेलमध्ये डॉ. मोरे जातो मुलींच्या बेडवर बसतो. रोज कॉलेजमध्ये मनावर दडपण ठेवून जातो. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना प्रशासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांसमोर या विद्यार्थीनी माझ्या मुलीसारख्या आहेत. स्वच्छ प्रतिमा स्वतःहून सांगतो अन् माझी मुलगी म्हणतो नंतर त्याच मूलींबरोबर फ्लर्ट करतो. लज्जास्पद बोलतो. विद्यार्थी अन् शिक्षक या नात्याला मोरे कलंक आहे. असे सांगत तीव्र संतापजनक भावना मुलींनी रडत रडत व्यक्त केल्या.मूलींचा त्रास ऐकुन उपस्थितांचेही डोळे पाणावले.  मुली एफआयआर करायला तयार आहेत तर पोलिस नंतर करू, नंतर बघू असं वारंवार सांगुन टाळाटाळ करतात असेही उपोषणकर्त्यां मुलींनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत वाखारे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, अतिरिक्त महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षा जाधव, वनविभागाचे आधिकारी व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अटकेसाठी उपोषणावर ठाम – जामखेडचं नाव शैक्षणिक क्षेत्रात राज्यभर नेले आणि तितकेच बदनाम केले. तसेच आंदोलनकर्त्यां मूलींची आर्थिक शारीरिक व मानसिक छळवणूक झाली म्हणून आंदोलनाची धग का कशी वाढली याला डॉ भास्कर मोरे कसा जवाबदार आहे हे पांडुरंग भोसले, आण्णासाहेब सावंत, हनुमंत पाटील, रमेश आजबे, केदार रसाळ, बापुसाहेब कारले यांनी सविस्तर सांगितले. पांडुरंग भोसले मोरेला अटक व कॉलेज मान्यता रद्दसाठी उपोषणावर ठाम.

डॉ. भास्कर मोरेला कोणत्याही क्षणी अटक –  रत्नदीपच्या मूलामूलींच्या सर्वच प्रकारच्या तक्रारींची दखल घेऊन गून्हे दाखल करू तसेच मुलींच्या तक्रारीची गोपनीयता ठेवुन कारवाई करणार आहे. डॉ भास्कर मोरेच्या मागावर आमचे पोलिस आहेत कोणत्याही क्षणी त्याला अटक होऊ शकते असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.

COMMENTS