Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जांवरील मुद्रांक शुल्क माफ

शेतकर्‍यांना दिलासा; मंत्री बावनकुळे यांची घोषणामुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पीक कर्ज घेताना आकारले जाण

अतिवृष्टीने केले नुकसान; त्यात तलाठी भाऊसाहेबाची भर ! मदतीपासून खरे शेतकरी वंचित…
सदगुरु कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा उत्साहात
शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी केंद्र सुरू

शेतकर्‍यांना दिलासा; मंत्री बावनकुळे यांची घोषणा
मुंबई ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पीक कर्ज घेताना आकारले जाणारे मुद्रांक शुल्क पूर्णतः माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत शेतकर्‍यांचा मोठा दिलासा दिला आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेती व पीक कर्ज व्यवहारांवर ही सवलत लागू राहणार असून, 1 जानेवारी 2026 पासून हा निर्णय अंमलात येणार आहे. यासंदर्भातील अधिकृत राजपत्रही शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी या निर्णयाची औपचारिक घोषणा करत शेतकर्‍यांना आनंदाची बातमी दिली. ते म्हणाले की, शेती हा निसर्गावर अवलंबून असलेला आणि मोठ्या जोखमीचा व्यवसाय आहे. हवामानातील अनिश्‍चित बदलांचा थेट फटका शेतकर्‍यांना बसतो. अशा परिस्थितीत पीक कर्ज हा शेतकर्‍यांसाठी आधार ठरतो. मात्र कर्ज घेताना लागणारा अतिरिक्त खर्च अडचणी वाढवणारा ठरत होता. हे लक्षात घेऊन सरकारने मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, 1958 च्या कलम 9 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून लोकहिताच्या दृष्टीने घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या सवलतीचा लाभ राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच ग्रामीण बँकांमार्फत घेतल्या जाणार्‍या शेती व पीक कर्ज व्यवहारांना मिळणार आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतीसाठी बियाणे, खते, औषधे, यंत्रसामग्री यांसाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. मुद्रांक शुल्क माफ झाल्यामुळे कर्जाची रक्कम थेट शेतीच्या गरजांसाठी वापरता येईल, असा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. यापूर्वी शासनाने विविध प्रतिज्ञापत्रांवरील 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ केले होते. त्या निर्णयाचा लाभ विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला होता.


मंत्री बावनकुळे यांनी भाजपचे नगरसेवक बिनविरोध का निवडून येत आहेत, याबाबतही भूमिका मांडली. ते म्हणाले की, भाजपला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळत असल्याने अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार स्वेच्छेने माघार घेत आहेत. हे कोणत्याही दबावामुळे होत नसून, जनतेच्या विश्‍वासातून घडत आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, हे लोकप्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकास मॉडेलनुसार काम करतील. तसेच पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS