Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी डेपो मंजूर करता आला नाही त्यांचे एमआयडीसीचे आश्‍वासन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात यांची टीका

कर्जत : रोहितदादा पवार यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन वर्षात कर्जतचा एसटी डेपो प्रश्‍न मार्गी लावला आहे. मात्र ज्यांना एसटी डेपो मंजूर

राष्ट्रीय परिषदेतून तंत्रज्ञानाच्या माहितीचा विस्तार ः डॉ. गुल्हाने
शिक्षक मतदार संघाची अशी असेल मतदान प्रक्रिया
बोल्हेगाव, नागपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट… नागरिक आक्रमक…

कर्जत : रोहितदादा पवार यांनी आमदार झाल्यानंतर पहिल्या दोन ते तीन वर्षात कर्जतचा एसटी डेपो प्रश्‍न मार्गी लावला आहे. मात्र ज्यांना एसटी डेपो मंजूर करता आली नाही, ते आता एमाआयडीचे खोटे आश्‍वासन देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी केला आहे.
कर्जतला एसटी डेपो होण्यासाठी अनेक पक्षांनी व व्यापारी संघटनांनी आंदोलने केली. मनसेनेही आंदोलन केले. त्या आंदोलनामधील मी एक आंदोलक आहे. आम्हीच सर्वांनी ते आंदोलन उभे केले व ते आंदोलन यशस्वी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु भाजप सरकारच्या आदेशाने मनसेचे आंदोलन चिरडण्यात आले व आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करुन आम्हाला येरवडा जेलची हवा खाण्यास भाग पाडले. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे स्थिर सरकार होते. पूर्ण 5 वर्षे प्रा. राम शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते व जिल्हयाचे पालकमंत्री होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्वात जवळचे आमदार म्हणून शिंदे यांची ओळख होती. मग त्यावेळी त्यांनी एसटी डेपोचा प्रश्‍न का सोडवला नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्याची वेळ का येत आहे. हे फक्त जनतेची व मुख्यमंत्री यांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. कर्जत शहराच्या अगदी जवळ नगर जिल्हयातील सर्वात मोठी एमआयडीसी आमदार रोहित पवार यांनी मंजूर केली होती. परंतु आ. राम शिंदे यांनी उद्योगमंत्री उदय सावंत यांना खोटी माहिती व खोटे कागदपत्रे दाखवून मंजूर एमआयडीसीला स्थगिती दिली. ज्यांना मंत्री पदाच्या काळात साधा एसटी डेपो मंजूर करुन घेता आला नाही ते आता एमआयडीसीचे खोटे आश्‍वासन कर्जत- जामखेडच्या जनतेला देत आहेत, अशी टीका नामदेव थोरात यांनी केली आहे.

COMMENTS