Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात धावती एसटी पेटली

65 प्रवाशी थोडक्यात बचावले

ठाणे/प्रतिनिधी ः ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या एसटी महामंडळाच्या धावत्या बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील

मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयावर शिंदे गटाचा कब्जा
साकुर्डीत वीज कोसळल्याने ट्रान्सफर्मरसह पिंपळाचे झाड जळाले
दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

ठाणे/प्रतिनिधी ः ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या एसटी महामंडळाच्या धावत्या बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील उथळसर प्रभाग समिती जवळील दर्ग्यासमोर ही घटना घडली असून चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे तब्बल 65 प्रवाशांचा जीव वाचला आहे. याशिवाय बसमध्ये आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळातच संपूर्ण आग विझवण्यात आली आहे. पेटत्या बसमधून बाहेर पडताच प्रवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

COMMENTS