बीड प्रतिनिधी - श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर शांतीचे ब्रम्ह आहे. संत सद्गुरु किसन बाबा यांच्या सानिध्याने व दर्शनाने आनंद आणि समाधान मिळते . गुण
बीड प्रतिनिधी – श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर शांतीचे ब्रम्ह आहे. संत सद्गुरु किसन बाबा यांच्या सानिध्याने व दर्शनाने आनंद आणि समाधान मिळते . गुणवंत ,कलाकार आणि भाविकांच्या उपस्थितीने गोरक्षनाथ टेकडी आज पंढरपूर झाली आहे. असे प्रतिपादन श्री ह भ प अतुल महाराज शास्त्री यांनी केले. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सद्गुरु संत किसन बाबा महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प गुंफताना ते बोलत होते.. यावेळी प्रमूख उपस्थिती शांतीब्रह्म महंत नवनाथ बाबा, श्री ह भ प भगवान महाराज राजपूत, श्री ह भ प हरिदास भाऊ जोगदंड,गणेश महाराज बांडे, वासुदेव म सुरवसे,भरत म पठाडे, अरुण मकदम, तुकाराम म राऊत, संतोष म वाघ, पुरुषोत्तम म कोटुळे, जगन्नाथ म कराळे, सचिन म थापडे,सचिन म मुंडे,ज्ञानेश्वर म खोटे,रामेश्वर म दराडे यांच्यासह हजारो भाविकांची उपस्थिती होती..
श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे सुरू असलेल्या भव्य अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प श्री ह भ प अतुल महाराज शास्त्री तागडगावकर यांचे संपन्न झाले. संत तुकाराम महाराजांच्या
सदा नाम घोष करू हरी कथा ! तेणे सदा चिता समाधान !!
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार ! आनंदे निर्भर डूल्लतसो !!
असो ऐसा कोठे आठवायची नाही ! देहीच विदेही भोगू दशा !!
तुका म्हणजे आम्ही झाली अग्नी रूप! लागून यनेदी पाप पुण्य अंगा !!
या अभंगावर चिंतन मांडताना संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून नाम साधना केल्यानंतर झालेल परिवर्तन आणि बदल सांगतात. संत हे परिवर्तन शील असतात.संत प्रवाहाच्या विरोधात वागतात. मात्र लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. संसारात संपत्ती पैसा धन सुख देणारे नाही तर सुख आणि समाधान मिळवायचे असेल तर संताच्या सानिध्यात यावं लागेल.मानवी जीवनात सुख – दुःखाचे दिवस येतं असतात आणि जात असतात. सुख आणि समाधान मिळवायचे असेल तर गोरक्षनाथ टेकडीच्या सानिध्यात आले पाहिजे असे देखील अतुल महाराज शास्त्री यांनी सांगितलं. तसेच संत तुकाराम महाराज यांनी अंधश्रधेवर आघात केला.. साधूला दृष्टी असते त्यामुळे परीवर्तन होतें. आज गोरक्षनाथ टेकडी विकासाकडे वाटचाल करत आहे.सद्गुरु किसन बाबा आणि शांती ब्रह्म नवनाथ बाबा या दोघांच्याही दूरदृष्टी मुळे आज गोरक्षनाथ टेकडी खरी सोन्याची वाटत आहे.
गुरु सेवा आणि ज्ञान माणसाला दृष्टीवान बनवते
रावण बुद्धिमान आणि बिभीषण दृष्टीवान होता. बुद्धिवान असूनही जर दृष्टी नसेल तर घात झाल्याशिवाय राहत नाही. संत महात्मे पाप आणि पुण्य स्वतःच्या अंगाला लागू देत नाहीत. सद्गुरू संत किसन बाबा यांना रिद्धी सिद्धी प्राप्त होती. गोरगरीब भोळ्या बाबल्या लोकांच्या जीवनातील दुःख हरण्याचं काम केलं असं देखील अतुल महाराज म्हणाले.. यावेळी कीर्तनासाठी साथ संगत मृदंग विशारद अरुण महाराज कदम, मृदंग सम्राट भरत महाराज पठाडे. यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक व गोरक्षनाथ टेकडी परिसरातील टाळकरी मंडळी आणि सेवेकरांची उपस्थिती होती.
COMMENTS