Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीराम कथा व अखंड हरीनाम सप्ताह रायतळेत उत्साहात

सुपा ः पारनेर तालुक्यातील रायतळे येथील गणेशवाडी येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्रीराम कथा व अखंड हरीनाम सप्तहाचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आले

पत्रकार दातीर खूनप्रकरणाचा तपास उपअधीक्षक मिटकेंकडे
वांबोरीतील जनता दरबारात दिव्यांग महिलेला ना.तनपुरे यांनी दिले स्वतः रेशनकार्ड
मराठी राजभाषा ही समृद्ध भाषा – प्रा.डॉ.जयंत गायकवाड

सुपा ः पारनेर तालुक्यातील रायतळे येथील गणेशवाडी येथे हनुमान मंदिराच्या प्रांगणात श्रीराम कथा व अखंड हरीनाम सप्तहाचे आयोजन सालाबाद प्रमाणे करण्यात आले होते. सप्ताहात दैनंदिनी कार्यक्रमात काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, हरीपाठ व संध्याकाळी श्रीराम कथेचे अध्ययन केले जात होते. सुपा पंचक्रोशीतील सर्व भाविक, महिला भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या. सप्ताह सोहळा 18 ऑगस्टपासून प्रारंभ होऊन 24 ऑगस्ट रोजी ग्रथराज शिवलीला अमृत पारायण तपोपूर्ती सोहळानिमित्त श्रीराम कथा प्रवक्त्या ह.भ.प. ज्योतीताई धनाडे यांच्या मधूर वाणीतून कथा सांगितली गेली. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील अनेक भाविक मोठ्या संखेने उपस्थित होते. सप्ताहाची सांगता म्हणून ह.भ.प. रमेश महाराज मासाळ यांच्या वानीतुन काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS