Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय संतसाहित्य पुरस्कार घोषित; प्राचार्य डॉ. कुंभार, ब्राह्मणकर, प्रा. सोनवणे, रसाळगुरुजी पुरस्काराचे मानकरी

श्रीरामपूर ः येथील इंदिरानगर (शिरसगाव) मधील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय संतसाहित्य पुरस्कार घो

एस.टी.महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात : पालकमंत्री विखे पाटील
पेठवडज जवळ खुले आम दारू विक्रीविरोधात  नागरिकांनी, दारूबंदी अधिकाऱ्याच्या कार्यालयावर घातला घेराव  
खेड्या-पाड्यात 10 हजारात चोरीच्या दुचाकींची विक्री; दोघांना पोलिस पथकाने उचलले

श्रीरामपूर ः येथील इंदिरानगर (शिरसगाव) मधील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय संतसाहित्य पुरस्कार घोषित झाले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या संशोधनात्मक संपादित’ भारतीय कुंभार समाज: शोध आणि बोध’ या ग्रंथाचे पाच खंड विषयानुरूप पुढील प्रमाणे आहेत.01- हुंभार समाज: माहिती, कुंभार उत्पत्ती: इतिहास, कुंभार समाज: शहर, प्रांत इतिहास, कुंभार समाज: व्यक्तिपर लेख आणि कुंभार समाज: संस्कृती व परंपरा अशा ग्रंथास तसेच नागपूर येथील विजयाताई ब्राह्मणकर यांच्या ’शेगावीचा राणा’ या चरित्र ग्रंथास, संगमनेर येथील प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे यांच्या ’देवमाणसं’ या व्यक्तिचित्रात्मक ग्रंथास तर माजी मुख्याधापक दत्तात्रय सावळेराम उर्फ द.सा. रसाळगुरुजी यांच्या ’बोधामृत’ या प्रबोधक लघुकथाग्रंथास श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय संतसाहित्य पुरस्कार2025 घोषित झाले आहेत.
09 मे 1990 पासून श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठान गेल्या 35 वर्षापासून साहित्यिक, समाजप्रबोधक उपक्रमांतून संत गोरा कुंभार पुण्यतिथी साजरी करीत आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये, अध्यक्ष प्रा. विलासराव शिवाजी तुळे, उपाध्यक्ष मेजर नंदकुमार संतराम सैंदोरे, कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये, कार्यवाह नीतीन प्रभाकर जोर्वेकर आणि सचिव सौ. आरती गणेशानंद उपाध्ये यांच्या समितीने हे पुरस्कार घोषित केले. शनिवार दि.26 एप्रिल2025 रोजी सकाळी10 वाजता इंदिरानगर येथे श्रीसंत गोरा कुंभार यांच्या 708 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती सुमनबाई श्रीधर मांढरे, कोषाध्यक्षा मंदाकिनी बाबुराव उपाध्ये, प्रा. पल्लवी नंदकुमार सैंदोरे, माधुरी नीतीन जोर्वेकर, चेतन विलासराव तुळे, श्रद्धा चेतन तुळे आदिंनी केले आहे.

COMMENTS