Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई शहरात जंतूनाशक औषधी धुराच्या फवारणी करा-संजय गंभीरे

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई शहरात जंतूनाशक औषधी धुराच्या फवारणीसह इतर आवश्यक उपाय योजना करणेबाबत अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशा

कराड तालुका स्वस्त धान्य दुकानदारांचे लाक्षणिक उपोषण
सद्गगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात
राहुरीत गावकीच्या सहकाराचे धुराडे पेटले

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई शहरात जंतूनाशक औषधी धुराच्या फवारणीसह इतर आवश्यक उपाय योजना करणेबाबत अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक उत्कर्ष गुट्टे यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने माशांचे व डासांचे प्रचंड प्रमाण वाढले असल्याने शहरात डेंगूसह साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले असून शहरातील सर्वच प्रभागात लहान मुले,महिला,नागरिक, वयोवृद्ध नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे शहरात जंतूनाशक औषधी धुराच्या फवारणीसह स्वच्छते संदर्भात आवश्यक उपाय योजना त्वरित करण्यात यावी याकरिता ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक उत्कर्ष गुट्टे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मा.नगराध्यक्ष महादु मस्के,भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष, संजय गंभीरे,महेश अंबाड,अमोल पवार, दिग्विजय लोमटे, अक्षय भुमकर, सत्यप्रेम इंगळे,मयूर रणखांब,राहूल कापसे, माणिक पाटील, दिपक लामतुरे,राम गायके व अतुल कसबे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

COMMENTS