Homeताज्या बातम्याशहरं

क्रिडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकली

परभणी : परभणीत घडलेल्या या घटनेमध्ये जिल्हा क्रिडा क्रीडा अधिकारी यांनी स्विमिंग पुल बांधकामाच्या परवानगीसाठी अडिच लाखरूपये लाचेची मागणी केली. तड

कु. पायल जाधव हिला जयपूर येथे तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक
विराट कोहलीचा मोठा पराक्रम, सचिन तेंडुलकरचा मोडला विक्रम
दिल्ली येथील राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत  लोह्याच्या वर्षा तोंडारेची कास्यपदाकाची कमाई

परभणी : परभणीत घडलेल्या या घटनेमध्ये जिल्हा क्रिडा क्रीडा अधिकारी यांनी स्विमिंग पुल बांधकामाच्या परवानगीसाठी अडिच लाखरूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दिड लाख रूपये नगदी स्विकारताच लाच लुचपत अधिकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले या संपूर्ण प्रकरणामुळे क्रिडा खात्यात एकच खळबळ माजली आहे.
कविता सुभाष नावंदे (निंबाळकर),वय 52 वर्षे, पद: जिल्हा क्रीडा अधिकारी,परभणी सध्या राहणार : मायवर्ल्ड फ्लॅट नंबर डी 6 -104 ता.जि.छत्रपती संभाजीनगर (वर्ग 1  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)नानकसिंग महासिंग बस्सी,वय 57 वर्षे, पद क्रीडा अधिकारी,परभणी रा.संभाजी नगर, तरोडा बुद्रुक.नांदेड.(वर्ग 3 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)तक्रारीचे स्वरूप -यातील तक्रारदार यांनी सन 2024 मध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तक्रारदार यांचे क्रीडा अकॅडमीचे जागेवर स्विमिंग पुलाचे 90 टक्के काम पूर्ण झालेले आहे. सदर क्रीडा स्पर्धा आयोजनाचे 5 लाख रुपये आणि स्विमिंग पुलाच्या बांधकामांचे 90 लाख रुपयांचे बिल कविता नावंदे यांचे कार्यालयात प्रलंबित होते.       दि.03/03/2025 रोजी तक्रारदार हे सदर कामांचे बिले मंजूर करून घेण्यासाठी लोकसेविका कविता नावंदे व क्रीडा अधिकारी बस्सी यांना भेटले असता नावंदे यांनी स्वतःसाठी 2,00,000 रुपये आणि सहकारी क्रीडा अधिकारी बस्सी यांचे करिता 50,000 रुपये असे एकूण 2,50,000 रुपये तक्रारदार यांना मागितले.कविता नावंदे या बिलामध्ये जाणून बुजून त्रुटी काढतील म्हणून इच्छा नसताना तक्रारदार यांनी दि.13/03/2025 रोजी  1,00,000 रुपये लोकसेविका कविता नावंदे यांना क्रीडा अधिकारी बस्सी यांचे समक्ष दिले. तक्रारदार यांना उर्वरित लाच रक्कम 1,50,000 रुपये लोकसेवक बस्सी आणि लोकसेविका कविता नावंदे यांना देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 24/03/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,परभणी येथे तक्रार दिली होती.तक्रारीची पडताळणी- दि.24/03/2025 रोजी पंचासमक्ष  लाचमागणी पडताळणी केली असता लोकसेवक बस्सी आणि लोकसेविका नावंदे यांची भेट झाली नाही. दिनांक 25/03/2025 रोजी पडताळणी केली असता  फक्त लोकसेविका कविता नावंदे यांची भेट झाली. तक्रारदाराराने प्रलंबित लाचेसंदर्भात बोलले असता त्यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांना सांगितले की, बस्सी सर येतील, ते करून टाका. असे म्हणून उर्वरित लाच रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शवली.सापळा कारवाई – लाचमागणी पडताळणी कारवाई मध्ये लोकसेविका कविता नावंदे यांनी स्पष्टपणे रक्कम सांगितली नसल्याने तक्रारदार यांना पंचासमक्ष दोन्ही लोकसेवकांकडून स्पष्टपणे निश्चित लाचेची रक्कम ठरल्यानंतरच लाच रक्कम लोकसेवकांना देण्याविषयी सूचना देऊन  दिनांक 27/03/2025 रोजी सापळा कारवाई आयोजित करण्यात आली. पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा  कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक नानकसिंग बस्सी यांनी स्वतःसाठी 50,000 रुपये आणि लोकसेविका कविता नावंदे यांनी त्यांच्यासाठी 1,00,000 रुपये अशी लाच मागणी केली व लागलीच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवून तक्रारदारास नवांदे यांचे दालनात घेऊन गेले. तेथे दोन्ही लोकसेवकांनी तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम स्विकारली आहे. आरोपी नानकसिंग बस्सी आणि कविता नावंदे यांना लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले आहे

COMMENTS