संगमनेर/प्रतिनिधी ः स्वर्गीय उद्योगपती माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सफायर मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्
संगमनेर/प्रतिनिधी ः स्वर्गीय उद्योगपती माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सफायर मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील पाच गटांची विजेतेपदे अनुक्रमे अजय राठोड, आर्या अंत्रे, खुशी हासे, सचिन भारद्वाज, आणि संदीप चौधरी यांनी पटकावली.
मालपाणी उद्योग समूहाचे स्व.उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ मागील दहा वर्षांपासून लायन्स क्लब संगमनेर सफायर द्वारे सहा किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. रविवारी सकाळी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालपाणी लॉन्स पासून स्पर्धेला शुभारंभ झाला लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे चेअरमन बाळासाहेब देशमाने, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष, गिरीश व आशिष मालपाणी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कदम, ‘सफायर’ चे अध्यक्ष उमेश कासट यांचा समावेश होता. मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने विजेत्यांना 36 हजार रुपयांची रोख बक्षिसे व सन्मानचिन्हे देण्यात आली. ‘सफायर’चे संस्थापक-अध्यक्ष उद्योजक लायन गिरीश मालपाणी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला ‘रन फॉर फिटनेस’ असा हा उपक्रम सर्व वयोगटातील उत्साही स्पर्धकांच्या उत्स्फूर्त व भरगच्च सहभागाने दरवर्षी गाजत असतो. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी सफायरचे संस्थापक गिरीश मालपाणी आणि श्रीनिवास भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष उमेश कासट ,सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी प्रकल्प प्रमुख सुनिता मालपाणी, पूजा कासट, श्रद्धा मणियार, अनिरुद्ध डिग्रसकर, अतुल अभंग, चैतन्य काळे, कृष्णा आसावा, प्रणित मणियार इत्यादी लायन्सने प्रकल्प प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. प्रकल्प समन्वयक म्हणून श्रीनिवास भंडारी, राजेश रा. मालपाणी महेश डंग तर प्रकल्प समिती सदस्य म्हणून डॉ अमोल पाठक, अमर लाहोटी, नामदेव मुळे, विजय ताजणे रोहित मणियार, विलास बेलापूरकर, सुमित मणियार, अतुल देशमुख, धनंजय धुमाळ, जितेंद्र पाटील , विशाल नावंदर, सिद्धांत कासट, सुभाष मणियार, जितेश लोढा, योगेश जोशी, ओम इंदाणी, अमोल वालझाडे, संकेत कलंत्री, देविदास गोरे, मीना मणियार, राजश्री भंडारी, डॉ मधुरा पाठक, नम्रता अभंग, प्रियंका कासट, अनुजा सराफ, आदित्य राठी, मंजुषा भोत यांच्यासह सर्व सफायर सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.
COMMENTS